रायुडूची वादग्रस्त कारकिर्द आणि कामगिरी

अंबाती रायुडूने अचानक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

Updated: Jul 3, 2019, 05:47 PM IST
रायुडूची वादग्रस्त कारकिर्द आणि कामगिरी title=

मुंबई : टीम इंडियाचा मधल्या फळीतील अंबाती रायुडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. बीसीसीआयला लेखी पत्र देत त्यांनी ही माहिती दिली. वर्ल्डकपमध्ये संधी न मिळाल्याने अंबाती रायुडू नाराज होता. त्यामुळे त्याने निवृत्ती घेतल्याचे समजत आहे. टीम इंडियाच्या अंतिम-१५ मध्ये त्याला संधी मिळाली नाही. 

वर्ल्ड कपसाठीच्या चौथ्या क्रमांकासाठी तो प्रबळ दावेदार समजला जात होता. परंतु त्या ऐवजी अष्टपैलू विजय शंकरला संधी देण्यात आली. निवडकर्त्यांनी विजय शंकरला 3D खेळाडू म्हटले होते.

वर्ल्डकपसाठीच्या टीममध्ये त्याला डावळल्याने रायुडू नाराज होता. पण त्याला आपली नाराजी जास्त दिवस लपवता आली नाही. त्याने आपली नाराजी काही दिवसांपूर्वी ट्विरवर ही व्यक्त केली होती.हा वर्ल्ड कप 'थ्री-डी' चष्मा लावून पाहू असे ट्विट त्याने केले होते. 

 

दरम्यान या सर्व नाराजी नाट्यानंतर रायुडूला वर्ल्डकपसाठीच्या राखीव खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला. शिखर धवन आणि विजय शंकर यांना दुखापतीनंतर देखील रायुडूला संधी देण्यात आली नाही. त्यामुळे रायुडूची ही नाराजी वाढली.

आइसलँडकडून खेळण्याची संधी

अंबाती रायुडूला आइसलँडने आपल्याकडून खेळण्याची आणि नागरिक्त देण्याची ऑफर दिली आहे. नागरिक्तवासाठीच्या सर्व नियमांची माहिती देखील यामध्ये देण्यात आली आहे.

 

याबाबतचे ट्विट आईसलंडने आपल्या अधिकृत खात्यावरुन केले आहे. हे ट्विट किती गांभीर्याने केले आहे, याबद्दल अजूनही शंका व्यक्त केली जात आहे. कारण यांच्याकडून अनेकदा गंमतीशीर ट्विट केले जातात. त्यामुळे हे ट्विट देखील किती गांभीर्याने केले आहे, याबद्दल रायुडूच्या चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे.

रायुडूने आपल्या रणजी क्रिकेटची सुरुवात हैदराबाद टीमकडून केली होती. परंतु तिथे देखील त्याचे काही मतभेद झाले. यामतभेदांमुळे त्याने हैदराबादमधून आंध्र प्रदेश टीममध्ये प्रवेश केला. त्यामुळे रायुडूची कारकिर्द ही एखाद्या वादग्रस्त राजकारण्यासारखीच राहिली, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

रायुडूची वनडे कारकिर्द

रायुडूने टीम इंडियासाठी एकूण ५५ सामने खेळले आहेत. यात त्याने १६९४ रन केल्या असून यात १० अर्धशतकांचा समावेश आहे. तर त्याने ६ टी-२० मॅचेस देखील खेळल्या आहेत. रायुडूने आपल्या ९ इनिंगमध्ये बॉलिगं देखील केली, त्यात त्याने ३ विकेट देखील मिळवल्या आहे. मध्यंतरी त्याची बॉलिंग एक्शन देखील वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.  

वनडेमध्ये २४ जुलै २०१३ ला झिम्बाब्वेविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. रायुडूने आपल्या कारकिर्दीतील अखेरचा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध यावर्षी ८ मार्चला खेळला होता.

आयपीएल कारकिर्द

आयपीएलमध्ये रायुडू मुंबई आणि चेन्नईकडून खेळला आहे. राय़ुडूने आयपीएलमध्ये एकूण १४७ सामने खेळले आहेत. यातील १४० डावांमध्ये त्याने ३३०० रन केल्या. यात १ शतक तर १८ अर्धशतकांचा समावेश आहे.