Ajinkya Rahane Captain: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल (WTC Final 2023) सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा दारूण पराभव केला. या सामन्यात अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) वगळता कोणत्याही इतर खेळाडूला चांगली कामगिरी करता आली नाही. टीम इंडियाचा सध्याचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) याला देखील चांगली कामगिरी करता आली नसल्याने त्याच्यावर टीका होताना दिसत होती. तर रोहितने कर्णधारपदाचा राजीनामा द्यावा, अशा मागणीने देखील जोर धरला होता. त्यामुळे आता भारतीय संघाला नवा कर्णधार (Team India New Captain) मिळणार की काय? असा सवाल उपस्थित केला जातोय.
टीम इंडिया 12 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान वेस्ट इंडिजविरुद्ध (WI vs IND) 2 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 5 टी-ट्वेंटी सामने खेळणार आहे. या दौऱ्यात टीम इंडियाच्या कसोटीची (Test Team) धुरा अजिंक्य रहाणे याच्या खांद्यावर सोपवली जाऊ शकते. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात रोहित शर्मा फीट दिसत नव्हता. त्याच्या टेस्टच्या रणनितीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, रोहित शर्माला आराम दिली जाऊ शकतो, त्यामुळे आता रोहित नाही तर कोण? अशा चर्चेला उधाण आल्याचं दिसून आलंय.
हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) 2018 पासून एकही टेस्ट सामना खेळला नाही. त्यामुळे आता त्याच्याकडे टी-ट्वेंटीची (t20) जबाबदारी दिली गेलीये. अशातच आता अजिंक्य रहाणे भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार होण्याची शक्यता आहे. अजिंक्य रहाणे यापूर्वी टीम इंडियाच्या कसोटी संघाचा उपकर्णधार होता. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियन मैदानात 2020-21 बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये ऐतिहासिक विजय नोंदवला होता.
आणखी वाचा - World Cup 2023 : वर्ल्ड कप खेळण्यासाठी पाकिस्तान भारतात येणार नाही? मोठी अपडेट समोर
दरम्यान, अजूनही दोन्ही संघाची घोषणा झाली नाही. आगामी वनडे वर्ल्ड कपची रणनिती पाहता आता कोणत्या खेळाडूंना संधी देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आम्हाला कसोटीच्या फायनलसाठी वेळ मिळाला नाही, असं रोहित शर्माने पराभवानंतर म्हटलं होतं. त्यामुळे आता बीसीसीआय (BCCI) कोणता निर्णय घेणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.