Ajinkya Rahane : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ( ICC World Test Championship ) सामन्यात टीम इंडिया ( Team India ) बॅकफूटवर आहे. या सामन्यात टीम इंडियाकडून कांगारूंना एकटा भिडला तो म्हणजे अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane ). 18 महिन्यांनी टीम इंडियामध्ये ( Team India ) कमबॅक करत अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना पुन्हा एकदा त्याचं जुनं रूप दाखवून दिलंय. दरम्यान या सामन्यामध्ये अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane ) बोटाला गंभीर दुखापत झाल्याचं समोर आलं होतं. अशातच आता अजिंक्यची पत्नी राधिका धोपवकर ( Radhika Dhopavkar ) हिने त्याच्या दुखापतीबद्दल माहिती दिलीये.
कांगारूंच्या 469 रन्सच्या आव्हानाला प्रत्युत्तर देण्यासाठी टीम इंडिया ( Team India ) मैदानावर उतरली खरी...मात्र भारताचे टॉप ऑर्डर फलंदाज पूर्णपणे फेल झाल्याचं यावेळी दिसून आलं. मात्र केवळ एकटा अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane ) कांगारूंशी भिडला आणि पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलं. फलंदाजी करत असताना अर्जुनच्या बोटाला गंभीर दुखापत देखील झाली. पण अशा परिस्थितीत देखील त्याने क्रिझ सोडण्याचा निर्णय घेतला नाही.
टीम इंडियाच्या पहिल्या डावामध्ये 22 वी ओव्हर सुरु असताना पॅट कमिंस गोलंदाजी करत होता. यावेळी कमिंसने रहाणेला टाकलेला बॉल थेट बोटावर जाऊन लागला. बॉल इतका जोरात लागला की, रहाणेच्या ( Ajinkya Rahane ) बोटाला दुखापत झाली. यावेळी रहाणेने फिजिओची मदत घेतली. वेदना होत असताना देखील रहाणेने ( Ajinkya Rahane ) क्रिझ सोडण्याचा निर्णय घेतला नाही.
अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane ) दुखापतीबाबत त्याची पत्नी राधिकाने माहिती दिली आहे. राधिकाने तिच्या इन्स्टाग्रामच्या पेजवरून एक फोटो शेअर केलाय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये राधिकाने ( Radhika Dhopavkar ) इमोशनल पोस्ट लिहीली आहे.
राधिका ( Radhika Dhopavkar ) लिहीते की, "तुझं बोट सुजलंय तरीही तुझी मानसिकता कायम मजबूत राहावी यासाठी तू स्कॅन करण्यास नकार दिलास. अविश्वसनीय निःस्वार्थता आणि दृढनिश्चय दाखवत तू तुझ्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित केलस. वचनबद्धतेसह तू क्रीझवर कायम राहिलास यामुळे सर्वांना प्रेरणा मिळाली. यामुळेच मला माझ्या प्रेमळ जोडीदाराचा सदैव अभिमान आहे. माझ्या तुझ्यावर भरपूर अनंत प्रेम आहे"
सामन्याच्या चौथ्या दिवशी अजिंक्य रहाणेने स्वतः त्याच्या दुखापतीबद्दल माहिती दिलीये. तो म्हणाला, 'मला वेदना होतायत. पण, त्या सहन करता येण्याजोग्या आहेत. मला नाही वाटत की. यामुळं माझ्या फलंदाजीवर कोणताही परिणाम होईल. सध्यातरी मी ज्या पद्धतीनं फलंदाजी केली आहे त्याबाबत मला आनंद आहे.