Ajinkya Rahane रात्रीच्या वेळेस करतोय 'हे' काम, व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. 

Updated: Oct 26, 2022, 07:06 PM IST
Ajinkya Rahane रात्रीच्या वेळेस करतोय 'हे' काम, व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल title=

मुंबई : मराठमोळा क्रिकेटर अजिंक्य रहाणेच्या घरी पुन्हा एकदा चिमुकल्या पावलांचं आगमन झालं आहे. रहाणेच्या पत्नीने नुकतंच त्यांच्या बाळाला जन्म दिलाय. रहाणेने सोशल मीडियावरून ही आनंदाची बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचवली होती. तर आता अजिंक्यची बायको राधिकाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओच्या माध्यमातून रहाणे सध्या नाईट ड्युटीवर असल्याचं दिसतंय. 

अजिंक्य दुसऱ्यांदा वडील झाला असून राधिकाने यावेळी मुलाला जन्म दिलाय. राधिकाने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये अजिंक्य त्यांच्या नवजात बाळाला रात्रीच्या वेळी शांत झोपवताना दिसतोय. इतकंच नाही तर अजिंक्यची मुलगी आर्या त्या बाळासाठी 'ट्विंकल ट्विंकल' ही पोएम म्हणताना दिसतेय. 

हा व्हिडीओ चाहत्यांना फार आवडला असून त्यांनी यावर लाईक्सचा वर्षाव केला आहे. अनेकांना आर्याचं निरागस रूप फारच भावलंय. हा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. 

मुलगा झाल्याची बातमी रहाणेने आपल्या चाहत्यांनाही सोशल मीडियावर पोस्ट करत दिली होती. तो म्हणाला होता, आमच्या बाळाचं मी आणि राधिकाने मिळून आनंदाने  स्वागत केलं आहे. राधिका आणि नुकतंच जन्मलेलं आमचं बाळ दोघेही सुखरूप आहेत.तुमच्या प्रेमासाठी आणि आशिर्वादासाठी खूप आभारी आहोत.

अजिंक्य रहाणेने सप्टेंबर 2014 मध्ये बालमैत्रिण राधिका धोपावकरसोबत लग्न केलं होतं. अजिंक्य आणि राधिका हे बालपणीचे मित्र आहेत. या मुलाच्या आधी राधिकाने 2019 मध्ये एका मुलीला जन्म दिला होता, तिचं नाव आर्या ठेवलं आहे.