पाकच्या पराभवानंतर 'ओ भाई मारो...' म्हणणाऱ्या शाकिबचा व्हिडिओ पुन्हा वायरल म्हटला, 'मेरा घर...'

T20 वर्ल्ड कप 2021 मध्ये पाकिस्तानी संघाचा प्रवास संपला असून गुरूवारी दुसऱ्या सेमीफायनलमध्ये बाबर आझमच्या टीमला ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 विकेटने पराभव स्विकारावा लागला आहे. 

Updated: Nov 12, 2021, 12:43 PM IST
पाकच्या पराभवानंतर 'ओ भाई मारो...' म्हणणाऱ्या शाकिबचा व्हिडिओ पुन्हा वायरल म्हटला, 'मेरा घर...' title=

मुंबई : T20 वर्ल्ड कप 2021 मध्ये पाकिस्तानी संघाचा प्रवास संपला असून गुरूवारी दुसऱ्या सेमीफायनलमध्ये बाबर आझमच्या टीमला ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 विकेटने पराभव स्विकारावा लागला आहे. पाकिस्तानी टीमने सलग पाच सामन्यांमध्ये विजय संपादन करून उपांत्य सामन्यापर्यंत मजल मारली होती. 

पाकिस्तानच्या पराभवानंतर कोट्यावधी पाकिस्तानी चाहते निराश आहेत. अशातच संघाचा एक प्रशंसक मोमिन शाकिबचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाकच्या पराभवानंतर स्टेडिएममध्ये निराश होऊन बसला आहे. शाकिबने हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Momin Saqib (@mominsaqib)

व्हिडिओमध्ये शाकिब म्हणतोय की, 'घरी जाण्यास माझं मन नाही म्हणतंय. सामन्याच्या पराभवामुळे दुःख तर होणार ना. परंतु मुलांनी चांगला खेळ खेळला आहे. एका पाठोपाठ सामने जिंकले. मला त्यांच्यापासून कोणतीही तक्रार नाही. ते चांगले क्रिकेट खेळले आहेत. ते आमचे चॅम्पिअन आहेत. ज्यांच्यावर आम्हा लोकांचे प्रेम आहे. आजचाही सामना चांगला खेळले. जिंकले असते तर चांगले झाले असते परंतु आमचं त्यांच्यावरील प्रेम कायम आहे.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Momin Saqib (@mominsaqib)

मोमिन शाकिब हा तोच व्यक्ती आहे. ज्याचा 'मारो, मुझे मारो...'हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाला होता. 2019 वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानला हरवल्यानंतर त्याचा व्हिडिओ वायरल झाला होता. सध्याच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारताच्या विरुद्ध पाकिस्तानच्या विजयानंतर देखील शाकिबचा व्हिडिओ वायरल झाला होता. ज्यामध्ये तो आपल्या टीमच्या विजयाचा आनंद पाकिस्तानी झेंडा फडकाऊन करीत होता. 

पाकिस्तानने पहिल्यांदा वर्ल्ड कपच्या इतिहासात भारताला हरवले आहे. याआधी खेळले गेलेले सर्व 12 वर्ल्ड कप सामन्यांमध्ये भारताला विजय मिळाला आहे.