Asia Cup नंतर 'हा' खेळाडू दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर; 'या' दिवशी अडकणार लग्नाच्या बेडीत

भारत विरूद्ध पाकिस्तान ( India Vs Pakistan ) यांच्यात सामना रंगणार आहे. दरम्यान आशिया कप संपल्यानंतर एक खेळाडू पुन्हा एकदा बोहल्यावर चढणार असल्याचं समोर आलंय. 

सुरभि जगदीश | Updated: Sep 9, 2023, 08:04 AM IST
Asia Cup नंतर 'हा' खेळाडू दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर; 'या' दिवशी अडकणार लग्नाच्या बेडीत title=

Shaheen Afridi: सध्या एशिया कप ( Asia Cup 2023 ) सुरु असून पाकिस्तानची टीम चांगला खेळ करताना दिसतेय. या स्पर्धेमध्ये भारत विरूद्ध पाकिस्तान ( India Vs Pakistan ) यांच्यात सामना रंगणार आहे. दरम्यान आशिया कप संपल्यानंतर एक खेळाडू पुन्हा एकदा बोहल्यावर चढणार असल्याचं समोर आलंय. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून पाकिस्तानचा गोलंदाज शहीन आफ्रिदी ( Shaheen Afridi ) आहे. आशिया कपनंतर शाहीन आफ्रिदी ( Shaheen Afridi ) पुन्हा एकदा लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. 

Shaheen Afridi पुन्हा अडकणार लग्नाच्या बेडीत

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी ( Shaheen Afridi ) याने भल्या भल्या फलंदाजांना क्लीन बोल्ड केलंय. शाहीन त्याच्या घातक गोलंदाजीसाठी ओळखला जातो. पण शाहिद आफ्रिदीची मुलगी अंशा आफ्रिदीच्या प्रेमात शाहीन क्लीन बॉलिंग झाला आहे. शाहीनने या वर्षी फेब्रुवारीमध्ये माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीची मुलगी अंशाशी लग्न केलं होतं. पण हे संपूर्ण लग्न आफ्रिदीच्या ट्रायबल पद्धतीनुसार झालं होतं.

फेब्रुवारीमध्ये तो आपल्या जवळच्या नातेवाईकांना बोलावू शकत नव्हता. त्यामुळे शाहीन ( Shaheen Afridi ) आणि अंशाने पुन्हा एकदा लग्नाचा निर्णय घेतला आहे. यावेळी इस्लामाबादमध्ये पाकिस्तान टीमसह अन्य नातेवाईकांना शाहीनने निमंत्रण दिलं आहे. शाहीन आफ्रिदी ( Shaheen Afridi ) 19 सप्टेंबर रोजी पुन्हा लग्न करणार आहे. तर 21 सप्टेंबर खास रिसेप्शन डीनर ठेवण्यात आला आहे. 

 

एशिया कपमध्ये शाहीनची उत्तम कामगिरी

यंदाच्या एशिया कपमध्ये पाकिस्तानची टीम चांगली कामगिरी करताना दिसतेय. आतापर्यंत पाकिस्तानने एकही सामना गमावलेला नाही. टीमसोबतच आशिया कपमध्ये पाकिस्तानी गोलंदाजांचं वर्चस्व दिसून आलं आहे. पाकिस्तानचा फास्ट बॉलर शाहीन आफ्रिदी ( Shaheen Afridi ) आशिया कप 2023 मध्ये फलंदाजांवर कहर केलाय. सध्या शाहीनने 3 सामन्यात गोलंदाजी केली असून त्यात त्याने 7 विकेट्स घेतल्या आहेत. 

पाकिस्तानचा पुढचा सामना भारताविरुद्ध 

रविवारी पाकिस्तानला पुढचा सामना आपल्याशी खेळायचा आहे. कोलंबोमध्ये हा सामना रंगणार असून या सामन्यासाठी रिझर्व्ह डे देखील ठेवण्यात आला आहे. जर रविवारी पाऊस पडला तर सोमवारी हा सामना खेळवण्यात येणार आहे. ग्रुप स्टेजमध्ये भिडलेल्या भारत पाकिस्तान सामन्यात पावसाच्या व्यत्ययाने सामना रद्द झाला होता. त्यामुळे रविवारी होणाऱ्या सामन्यात कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.