मुंबई: शोएब मलिकनंतर आणखी एक फलंदाज भारताचा जावई होणार आहे. शोएबनं सानिया मिर्झासोबत लग्न केल्यानंतर सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली होती. आता आणखी एक दिग्गज फलंदाज भारताचा जावई होणार आहे. ऑस्ट्रेलियाचा स्फोटक अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने एका भारतीय सौंदर्यवतीच्या प्रेमात पडला आहे. मॅक्सवेलने गेल्या वर्षी गर्लफ्रेंड विनी रमन बरोबर भारतीय प्रथेनुसार साखरपुडा केला होता.
गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये इन्स्टाग्रामवर याबाबत ग्लॅन मॅक्सवेलनं माहिती दिली होती. दोघांनीही भारतीय पद्धतीनं साखरपुडा केला होता. आता लवकरच दोघं विवाह बंधनात अडकणार आहेत. भारतीय मूळ असणाऱ्या तरुणीशी विवाह करणारे मॅक्सवेल दुसरा ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरणार आहे.
2019 मध्ये मॅक्सवेलची मानसिक स्थिती खूपच वाईट होती. त्याने क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता. तेव्हा त्याच्यासोबत त्याला सावरण्यासाठी विनी होती. त्याच्या कठीण काळात त्याला विनीनं मोठी साथ दिली आहे. विनीमुळेच पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरण्याची हिम्मत मिळाल्याचं मॅक्सवेलनं सांगितलं आहे.
विनी रमनने आधी मला होणारा त्रास ओळखला. मला त्यातून बाहेर पडण्यासाठी तिने मदत केली. तिच्यामुळे मी पुन्हा क्रिकेटच्या मैदानात खेळण्यासाठी उतरू शकलो. विनी आणि मॅक्सवेल 2017 पासून एकमेकांना डेट करतात.
2019च्या सुरुवातीला मॅक्सवेल आणि विनी ऑस्ट्रेलियन क्रिकेट पुरस्कार सोहळ्यात भेटले होते. काही महिन्यांपूर्वी हे जोडपे युरोपच्या सहलीला गेले होते. भारतीय वंशाची विनी ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये राहात आहे.