टी 20 वर्ल्ड कप 2021 ची सेमीफायनल गाजवणाऱ्या स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत, म्हणाला..

एबी डिविलियर्सनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या कामगिरीनं ज्याने गाजवलं....असा आणखी एक लवकरच घेणार संन्यास

Updated: Nov 20, 2021, 03:42 PM IST
टी 20 वर्ल्ड कप 2021 ची सेमीफायनल गाजवणाऱ्या स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत, म्हणाला.. title=

मुंबई: एबी डिविलियर्स पाठोपाठ आणखी एस स्टार खेळाडू संन्यास घेण्याच्या मार्गावर आहे. ऑस्ट्रेलिया संघाला टी 20 वर्ल्डकपमध्ये जिंकवण्यात याचाही मोठा वाटा आहे. लवकरच हा खेळाडू अधिकृत घोषणा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. 

सेमीफायनल सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने पाकिस्तानच्या हातून विजय खेचून आणला. सेमीफायनलमध्ये हा खेळाडू हिरो ठरला. त्याने ऑस्ट्रेलिया संघाला अंतिम सामन्याचे दरवाजे खुले करून दिले. ऑस्ट्रेलिया संघाचा स्टार खेळाडू मॅथ्यू वेड लवकरच संन्यास घेण्यासंदर्भात घोषणा करणार आहे. 

मॅथ्यू वेडने तसे संकेत दिले होते. ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर आणि फलंदाज मॅथ्यू वेड याने गुरुवारी याबाबत खुलासा केला. तो पुढच्या वर्षी टी 20 वर्ल्ड कपनंतर संन्यास घेणार आहे. 

दुखापतीमुळे मला न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 वर्ल्ड कप अंतिम सामन्यातून बाहेर पडावे लागले होते. वेड म्हणाला की ही माझी प्रेरणा आहे. आशा आहे की त्या विश्वचषकातही आम्ही जिंकू आणि विजेतेपदाचा रक्षण करू, त्यानंतर मी निवृत्ती घेऊ शकेन. 

वेडने बिग बॅश लीग (BBL) मध्ये तस्मानिया आणि होबार्ट हरिकेन्ससाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणे सुरू ठेवण्याची इच्छा असल्याचं म्हटलं आहे. वेडने पाकिस्तान विरुद्ध सामन्यात 17 बॉलमध्ये 41 धावा केल्या होत्या. त्याने पाकिस्तानच्या विजयाचं स्वप्न भंग केलं. 

मिचेल मार्शच्या 50 चेंडूत नाबाद 77 धावा आणि डेव्हिड वॉर्नरच्या अर्धशतकाच्या बळावर पाच वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाने रविवारी न्यूझीलंडवर आठ विकेट्स राखून मात करून प्रथमच टी-20 वर्ल्ड कप जिंकला. 

प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाठवलेल्या न्यूझीलंड संघाने कर्णधार केन विल्यमसनच्या 48 बॉलमध्ये  85 धावांच्या खेळीच्या जोरावर 4 बाद 172 धावा केल्या. प्रत्युत्तरात 'मोठ्या सामन्यांचे खेळाडू' वॉर्नर (38 बॉलमध्ये 53 धावा) आणि मार्श यांनी सात बॉल शिल्लक असताना अवघ्या दोन विकेट्स गमावून संघाला विजय मिळवून दिला.