नवी दिल्ली : बांग्लादेश क्रिकेट टीमचा ओपनर तमीम इकबाल आणि त्याच्या कुटुंबावर इंग्लंडमध्ये अॅसिड हल्ला झाला आहे. तमीम इंग्लिश काउंटीमध्ये क्रिकेट क्लबमध्ये खेळतो आहे.
या घटनेनंतर तमीमने काउंटी क्लबमध्ये खेळणं सोडलं आहे. बांग्लादेशमधील वृत्तपत्र द डेली स्टारमध्ये छापलेल्या माहितीनुसार घटना तेव्हा झाली जेव्हा जब तमीम पत्नी आएशा आणि एक वर्षाचा मुलगा यांच्यासोबत हॉटेलमध्ये जेवत होता.
वृत्तपत्राने केलेल्या दाव्यानुसार तमीमला हॉटेलमधून बाहेर जाण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर त्याच्यावर अॅसिड हल्ला केला. पण तेथून ते स्वत:ला वाचवत निघाले.
तमीम क्रिकेटच्या तिनही फॉरमॅटमध्ये बांग्लादेशसाठी सर्वाधिक रन करणारा खेळाडू आहे. त्याने १० हजार पेक्षाही अधिक रन बनवले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील त्याने चांगला खेळ केला होता.