IPL सुरु होण्याआधीच मुंबई इंडियन्सला धक्का, सुर्यकुमार यादव आयपीएलला मुकणार?

Surykumar Yadav Mumbai Indians: 22 मार्चपासून IPL 2024 चा सतरा हंगामा सुरु होतोय. आयपीएलचा पहिला सामना चेन्नई आणि बॅंगलोर यांच्यात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. तर या साऱ्या घडामोडींमध्ये  मुंबई इंडियन्सला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. 

Updated: Mar 12, 2024, 03:28 PM IST
IPL सुरु होण्याआधीच मुंबई इंडियन्सला धक्का, सुर्यकुमार यादव आयपीएलला मुकणार? title=

Suryakumar Yadav Health Update: आयपीएलचा सतरा हंगाम हा 22 मार्चपासून सुरु होतोय. आयपीएलचा पहिला सामना चेन्नई आणि बॅंगलोर यांच्यात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. तर बलवान टीम मानली जाणारी मुंबई इंडियन्सची पहिली मॅच 24 मार्चला बलाढ्य गुजरात टायटन्ससोबत (MI vs GT) अहमदाबाद येथे होणार आहे. पण या सामन्यापूर्वीच मुंबई इंडिन्सला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. मुंबईचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव या स्पर्धेत खेळणार की नाही, अशी शंका व्यक्त केली जाते. 

सूर्यकुमार हा मागीलवर्षी दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या टी 20  सिरीजमध्ये जखमी झाला होता. यानंतर त्याला सर्जरीसूद्धा करावी लागली होती. पण सर्जरीनंतर सूर्या भारतीय संघात परत आपली जागा मिळवू शकलेला नाही,  यावर बऱ्याच क्रिकेटतज्ञांचे म्हणणे होते की, सूर्यकुमार यादव हा आयपीलच्या नव्या मोसमात पुनरागमन करणार आहे. पण समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार असे मानले जात आहे की, सूर्या आयपीएल 2024 च्या सुरूवातीचे 2 सामने खेळणार नाही. 

सूर्यकुमार यादवची एनसीएमध्ये फिटनेस प्रॅक्टिस सुरू

सूर्यकुमार यादव हा सध्या बॅंगलोरच्या नॅशनल क्रिकेट अॅकेडमीमध्ये (NCA) सर्जरीनंतर आपली रिहॅबिलीएशन  प्रोसेस पूर्ण करत आहे. आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्स 24 मार्चला गुजरात टायटन्स आणि 27 मार्चला सनरायजर्स हैद्राबादविरूद्ध आपले सुरूवीतीचे सामने खेळणार आहे. पण सूर्यकुमार यादव हे दोन्ही सामने खेळणार की नाही, अशी चर्चा सध्या सुरु आहे.  यावर एनसीए च्या स्पोर्ट्स सायंस आणि मेडिकल टीमने अजून काही स्पष्ट वक्तव्य केलेले नाही. सूर्यकुमार यादने यावर कोणतीहि भूमिका मांडली नाही. पण सूर्या हा स्वतःच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आपल्या फॅन्ससाठी त्याचे फिटनेस अपडेट्स देत आहे. 

सूर्या इंस्टाग्रामवर फॅन्ससाठी देतोय फिटनेस अपडेट्स

सूर्यकुमार यादव हा आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सतत त्याच्या फिटनेसबद्दल अपडेट देत असतो. तो आपल्या अकाऊंटवर स्वतःच्या जिम आणि फिटनेसच्या स्टोरीज टाकत असतो. पण एनसीएमधल्या सूत्रांनी सांगितलले आहे की, मुंबईला आपली पहिली मॅच खेळण्यासाठी अजून 12 दिवस बाकी आहेत, तोपर्यंत बघण्यायोग्य गोष्ट असेल की, सूर्यकुमार हा मुंबई इंडियन्सच्या पहिल्या मॅचआधी रिकव्हरी करू शकतो की नाही?