रणजी क्रिकेट इतिहाचाचा एक फ्लॅशबॅक, ऐतिहासिक ५०० वी मॅच

रणजी क्रिकेटमध्ये कायम वर्चस्व गाजवणारी मुंबईची टीम ऐतिहासिक ५०० वी मॅच खेळतेय. ४१ वेळा रणजी ट्रॉफीला गवसणी घालणारी मुंबईची टीम नवा इतिहास रचतेय. पाहूयात मुंबईच्या रणजी क्रिकेटच्या इतिहाचाचा एक फ्लॅशबॅक. 

Updated: Nov 8, 2017, 07:53 PM IST
रणजी क्रिकेट इतिहाचाचा एक फ्लॅशबॅक, ऐतिहासिक ५०० वी मॅच title=

ब्युरो रिपोर्ट, मुंबई : रणजी क्रिकेटमध्ये कायम वर्चस्व गाजवणारी मुंबईची टीम ऐतिहासिक ५०० वी मॅच खेळतेय. ४१ वेळा रणजी ट्रॉफीला गवसणी घालणारी मुंबईची टीम नवा इतिहास रचतेय. पाहूयात मुंबईच्या रणजी क्रिकेटच्या इतिहाचाचा एक फ्लॅशबॅक. 

एक, दोन, तीन  नव्हे तर तब्बल ४१ वेळा मुंबईच्या टीमनं रणजी ट्रॉफी उंचावली. रणजीच्या ८३ वर्षांच्या इतिहासात सर्वाधिक यशस्वी टीम कुठली असेल तर ती म्हणजे मुंबईच. मुंबईची टीम बदलत गेली. नेतृत्व बदलले. मात्र, रणजी ट्रॉफी मुंबईकडे कशी राहिल हा एकमेव ध्यास या टीमध्ये येणाऱ्या प्रत्येक क्रिकेटपटूचा. त्यामुळेच खडूस मुंबईकर अशीच काहीशी या टीमची भारतीय क्रिकेटमध्ये ओळख. हा खडूसपणा मुंबईच्या प्रत्येक क्रिकेटपटूच्या नसानसात भिणलेला. कधीही हार न मानण्याच्या वृत्तीमुळे मुंबईच्या टीमचा रणजी क्रिकेटमध्ये कायमचं दबदबा पाहिला मिळतो.

१९३४ मध्ये रणजी क्रिकेटला सुरुवात झाली. आणि मग सुरु झाला भारतीय क्रिकेटमधील मुंबईच्या टीमचा सोनेरी प्रवास. मुंबईनं विक्रमी ४६ वेळा रणजी फायनलमध्ये प्रवेश केलाय. यात 41 वेळा रणजी ट्रॉफीवर नाव कोरण्यास त्यांना यश आलंय. १९५५-५६ ते १९७६-७७ मध्ये मुंबईचं सर्वाधिक वर्चस्व या टुर्नामेंटमध्ये दिसून आलं.

मुंबईनं याचदरम्यान २२ पैकी २० वेळा अजिंक्यपद पटकावलं. तर सलग १५ वेळा रणजी ट्रॉफी जिंकण्याची किमयाही केली. या टुर्नामेंटमधील सर्वाधिक रन्स या मुंबईकर वासिम जाफरच्या नावावरच आहे. १०१४३ रन्स त्याच्या नावावर आहेत. तर सर्वाधिक सेंच्युरीजही वासिम जाफरनचं केल्यात. 

विजय मर्चंट, दिलीप सरदेसाई, सुनील गावस्कर, अजित वाडेकर, पॉली उम्रीगर, फारुख इंजिनियर, विनू मनकंड, करसन घावरी, दिलीप वेगसकर, रवि शास्त्री, संजय मांजेरकर, सचिन तेंडुलकर, अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा या क्रिकेपटूंनी रणजीचं मैदान तर गाजवलंच शिवाय आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्येही आपली वेगळी छाप सोडली. सचिन तेंडुलकरसारखा कोहीनूर हिरा याच मुंबई क्रिकेटनं भारताला दिला.  

आणि टेस्टमधील बेस्ट प्लेअर सुनील गावसकरही मुंबईतच घडले. तर पद्माकर शिवलकर आणि अमोल मुझुमदारनं रणजीमध्ये लक्षवेधी कामगिरी करुनही त्यांनी भारतीय टीममध्ये संधी मिळाली नाही. आता श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शाह या क्रिकेटपटूंकडे मुंबईचं भविष्य म्हणून पाहिलं जातंय. 

एकेकाळी अर्धा डझन मुंबईचे क्रिकेटपटू भारतीय टीममध्ये असायचे. मात्र, आता हे चित्र बदललंय. आता पुन्हा एकदा मुंबई क्रिकेटनं तिच उंची पुन्हा गाठावी अशीच सामान्य मुंबईकर क्रिकेट चाहत्यांची अपेक्षा असेल.