IND vs SL: टीम इंडिया सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. यावेळी सध्या भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये वनडे सिरीज खेळवली जातेय. या सिरीजचा पहिला सामना शुक्रवारी खेळवण्यात आला. हा सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना श्रीलंकेच्या टीमने 230 रन्स केले. तर टीम इंडियाने देखील 230 रन्सवर ऑल आऊट झाली. यामुळे सामना टाय झाल्याचं घोषित करण्यात आलं.
टीम इंडियाने 9 विकेट गमावले असताना जिंकण्यासाठी 14 बॉल्समध्ये एका रनची गरज होती. अशावेळी टीम इंडियासाठी सामना जिंकणं शक्य होतं. मात्र सामनाय टाय झाला. यावेळी या सामन्यात टीम इंडियाकडून कोणत्या चूका झाल्या हे पाहूयात.
शुभमन गिल आणि रोहित शर्मा बाद केल्यानंतर टीम इंडियाने मोठा निर्णय घेतला. यावेळी टीम इंडियाकडून वॉशिंग्टन सुंदरला चौथ्या क्रमांकावर पाठवले. सुंदरला वरच्या क्रमांकावर फलंदाजीचा अनुभव आहे. यानंतरही सुंदर अपयशी ठरला. 4 बॉल्समध्ये 5 रन करून तो बाद झाला. सुंदरची विकेट गेल्यानंतर 87 रन्सवर 3 विकेट्स गमवाल्यानंतर टीम इंडिया दडपणाखाली आली. सुंदरला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्याचा निर्णय पूर्णपणे अपयशी ठरला.
पहिल्या वनडे सामन्यात अक्षर पटेलचा भारतीय टीमच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला गेला होता. T20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यासारख्या सामन्यात अक्षर पटेलला फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं होतं. त्यावेळी अक्षरने चांगली खेळी केली होती. त्याला चौथ्या क्रमांकावर पाठवलं असते तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता. अक्षर सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्यावेळी संघाने 132 धावांवर 5 विकेट गमावल्या होत्या. त्या परिस्थितीतून त्याने डावाची धुरा सांभाळली. रोहित शर्मानंतर अक्षरने भारताकडून सर्वाधिक 33 धावा केल्या.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने कॅप्टन्स इनिंग खेळली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 8 विकेट्सच्या मोबदल्यात 230 रन्स केले. याला प्रत्युत्तर देताना भारताने चांगली सुरुवात केली. दरम्यान या सामन्यात रोहित शर्मा चांगलाच आक्रामक दिसून आला. यावेळी अवघ्या 33 बॉल्समध्ये रोहितने अर्धशतक पूर्ण केलं. मात्र रोहित व्यतिरीक्त कोणत्याही फलंदाजाला साजेसा खेळ करता आला नाही. अखेरीस रोहित शर्माच्या अर्धशतकावर पाणी फेरलं गेलं.