40 Year Old Died On Cricket Ground After Hitting Six: सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये हृदयासंदर्भातील समस्या असलेल्या लोकांची संख्या वाढली आहे. बदललेली जीवनशैली, सातत्याने होणारी दगदग आणि इतर अनेक गोष्टींमुळे हृदयासंदर्भातील समस्यांमध्ये वाढ झाल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळेच अनेकदा चालता-बोलता एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला आणि उपचार मिळण्यापूर्वीच त्याने प्राण सोडल्याच्या घटना अनेकदा ऐकायला, पाहायला किंवा वाचायला मिळतात. रविवारी म्हणजेच 3 जून रोजी मुंबईतील काशिमीरा परिसरामध्ये अशीच एक घटना घडली आणि एका व्यक्तीने क्रिकेटच्या मैदानात फलंदाजी करतानाच प्राण सोडला.
समोर आलेल्या माहितीनुसार मिरारोड येथे रविवारी एका कंपनीने टर्फवर बॉक्स क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती. या कंपनीमधील कर्मचाऱ्यांच्याच दोन टीम एकेमांकाविरोधात खेळत होत्या. गुलाबी आणि काळ्या रंगाच्या कपड्यांमधील टीम फलंदाजी करत असताना रामगणेश थेवर स्ट्राइकवर होता. रामगणेशने एक उत्तम षटकार लगावला. मात्र चेंडू टोलवल्यानंतर तो क्रिजवर काही पावलं मागे गेला आणि जागेवर कोसळला.
आता क्षणभरापूर्वी षटकार लगावणाऱ्या रामगणेशला काय झालं हे कोणाला कळचं नाही. थोड्या वेळात सर्वजण धावत त्याच्याजवळ आले. मात्र तोपर्यंत त्याने प्राण सोडला होता. अशाप्रकारे आपल्या डोळ्यासमोर आपल्या सहकाऱ्याला गमावल्याने मैदानातील सर्वांनाच मोठा मानसिक धक्का बसला. अनेकांना तर रामगणेश आपल्याला कायमचा सोडून गेलाय यावर विश्वासच बसत नव्हता. रामगणेश हा अवघ्या 40 वर्षांचा होता. या प्रकरणामध्ये सध्या खाशीगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी चौकशी करत असून मैदानात उपस्थित असलेल्यांकडे नेमकं काय घडलं याची माहिती पोलिसांनी घेतली आहे. हा संपूर्ण घटनाक्रम कॅमेरात कैद झाला असून सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Video: सिक्स मारला अन् पुढल्या क्षणी मैदानाताच प्राण सोडला; घटनाक्रम कॅमेरात कैदhttps://t.co/4HhzmqiXun < येथे वाचा सविस्तर वृत्त, नेमका हा प्रकार घडला कुठे
(इशारा - ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात)#HeartAttack #Cricket #Six #ViralVideo #Video #Mumbai #CricketUpdates… pic.twitter.com/UaYlCVgd5n— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 3, 2024
जेव्हा आपण जास्त तेलकट पदार्थ खातो आणि शारीरिक हालचालींकडे लक्ष देत नाही, तेव्हा आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये खराब कोलेस्टेरॉल जमा होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. अशा परिस्थितीत रक्त हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, त्यामुळे रक्तदाब वाढतो आणि नंतर हृदयविकाराचा झटका येतो.
• हृदयाला रक्तपुरवठा योग्यपद्धतीने न झाल्यास हा आजार होऊ शकतो
• व्यायामाचा अभाव
• अतिताणतणाव
• धुम्रपान व मदयपानाची सवय
• लठ्ठपणा
• अयोग्य जीवनशैली
• पौष्टिक आहाराचा अभाव
हदयविकार टाळण्यासाठी खास टिप्सः-
• तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे हृदयाच्या धमक्यांवर परिणाम होतो. यामुळे धुम्रपान आणि मदयपानाचे सेवन करणे टाळावेत.
• शारीरिकदृष्ट्या तंदूरूस्त राहण्याने आपल्या हृदयाचे कार्य सुधारते. यामुळे सायकलिंग, चालणे, पळणे, पोहणे, अँरोबिक व्यायाम, ट्रेडिमिल आणि नियमित जॉगिंग करा. दररोज शारीरिक व्यायाम केल्याने शरीराला ऑक्सिजन योग्यप्रमाणात मिळण्यास मदत होते. याशिवाय हृदयाचे पंपिंग योग्यपद्धतीने होते.
• लठ्ठपणा टाळण्यासाठी विविध उपाय करा
• शाकाहारी, नट्स, बियाणे खावेत, ज्यामुळे आपल्या हृदयरोगाचा धोका कमी होऊ शकतो. खराब कोलेस्ट्रॉल कमी होईल आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढेल.
1. सातत्याने थकवा जाणवणे - अनेकदा सतत काम केल्याने थकवा जाणवतो, पण जेव्हा तुम्हाला कामाचा ताण कमी असूनही थकवा जाणवू लागतो, तेव्हा त्याचा अऱ्थ रक्तवाहिन्यांमधील अडथळ्यामुळे शरीराच्या अनेक भागांमध्ये रक्त योग्य प्रकारे पोहोचू शकत नाही असा होतो.
2. अनियमित हृदयाचे ठोके - जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये किंवा हृदयाभोवती रक्ताच्या गुठळ्या तयार होतात तेव्हा हृदयाचे ठोके अनियमित होतात.
छातीत दुखणे - छातीत दुखण्याची अनेक कारणे असू शकतात, ज्यामध्ये पोटात गॅस, कोणत्याही तणावामुळे अस्वस्थता यांचा समावेश होतो. पण ते हृदयविकाराचे लक्षण असू शकते.
(Disclaimer: येथे दिलेली आरोग्यविषयक माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. त्यामुळे तुम्ही वैद्यकीय सल्ला जरूर घ्या. ZEE 24TAAS याची पुष्टी करत नाही.)