२०१७ मधील बेस्ट वनडे टीम, भारताच्या ३ खेळाडूंचा समावेश

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 2017 सालातील सर्वोत्तम एकदिवसीय संघाची घोषणा केली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या कोणत्याही खेळाडुला यामध्ये स्थान मिळालेलं नाही.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 3, 2018, 09:44 AM IST
२०१७ मधील बेस्ट वनडे टीम, भारताच्या ३ खेळाडूंचा समावेश title=

मुंबई : क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 2017 सालातील सर्वोत्तम एकदिवसीय संघाची घोषणा केली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या कोणत्याही खेळाडुला यामध्ये स्थान मिळालेलं नाही.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या वनडे टीममध्ये आफ्रिकेच्या २ आणि इंग्लंडच्या 3 खेळाडूंना स्थान दिले आहे. पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानमधील 1-1 खेळाडूला या संघात स्थान मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघातील रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पंड्याचा या संघात समावेश करण्यात आला आहे.

कोहलीला केलं कर्णधार

विराट कोहलीला संघाचा कर्णधार बनवण्यात आला आहे. कोहलीने 2017 मध्ये 26 पैकी 19 सामन्यांमध्ये विजय मिळवला होता. रोहित शर्मा आणि क्विंटन डी. कॉकला सलामीवीर म्हणून निवडण्यात आले आहे. रोहित शर्मा 2017 मध्ये सर्वाधिक एकदिवसीय धावा करणारा दुसरा खेळाडू आहे. त्याने 6 शतक आणि पाच अर्धशतकांसह 1293 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेचा डी कॉक 2017 मध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. डी कॉकने 53.11 च्या सरासरीने 956 धावा केल्या.

बेस्ट वनडे टीम

रोहित शर्मा (भारत), क्विंटन डी कॉक (द अफ्रिका), विराट कोहली (कर्णधार, भारत), जो रूट (इंग्लंड), एबी डिव्हिलियर्स (द आफ्रिका), बेन स्टोक्स (इंग्लंड), हार्दिक पंड्या (भारत), लियाम प्लंकेट (इंग्लंड), ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड), हसन अली (पाकिस्तान), रशीद खान (अफगाणिस्तान).