क्रिकेटर इशांत शर्मासह २९ खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा यांच्या नावाची अर्जुन पुरस्कारासाठी क्रीडा मंत्रालयाने शिफारस केली आहे.

Updated: Aug 18, 2020, 06:39 PM IST
क्रिकेटर इशांत शर्मासह २९ खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस title=

मुंबई : भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा यांच्या नावाची अर्जुन पुरस्कारासाठी क्रीडा मंत्रालयाने शिफारस केली आहे. या शिवाय अतनू दास, महिला हॉकीपटू दीपिका ठाकूर, क्रिकेटपटू दीपक हूडा आणि टेनिसपटू दिविज शरण यांचीही या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी शिफारस केली गेली आहे. निवड समितीच्या बैठकीनंतर अधिकृत सूत्रांनी ही माहिती पीटीआयला दिली.

३१ वर्षीय इशांतने आतापर्यंत भारतासाठी ९७ कसोटी आणि ८० एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि त्याच्या नावावर ४०० हून अधिक आंतरराष्ट्रीय विकेट आहेत.

ऑलिम्पिक कांस्यपदक जिंकणारी साक्षी मलिक आणि वेटलिफ्टर मीराबाई चानू यांचीही नावं चर्चेत आहेत. पण अंतिम निर्णय क्रीडामंत्री किरण रिजिजू घेणार आहेत.

साक्षीला २०१६ मध्ये रियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकल्यानंतर खेलरत्न पुरस्कार दिला गेला होता. तर मीराबाईने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकल्यानंतर २०१८ मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत हा पुरस्कार मिळाला होता.