अवघ्या 19 वर्षाच्या बॉलरने विराटला पाठवलं पॅव्हेलियनमध्ये, व्हिडिओ व्हायरल

विराटला आऊट केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोयं. 

Updated: Nov 29, 2018, 11:56 AM IST
अवघ्या 19 वर्षाच्या बॉलरने विराटला पाठवलं पॅव्हेलियनमध्ये, व्हिडिओ व्हायरल  title=

नवी दिल्ली : सध्याच्या क्रिकेट बॅट्समन्समध्ये विराट कोहलीच सर्वोत्तम आहे. टी 20, वन डे, कसोटी या सर्वच फॉर्मेटमध्ये तो नवनवे रेकॉर्ड्स करतोय. नव्या पिढीसाठी विराट गळ्यातील ताईत बनलाय. कोणत्याही पिचवर कोणत्याही बॉलरसमोर तो टीकून राहू शकतो एवढंच नव्हे तर धुंवादार बॅटींगही करु शकतो ही त्याची खासियत म्हणावी लागेल. ज्याने भल्या भल्या बॉलर्सना पाणी पाजयलंय अशा विराटला 19 वर्षाच्या बॉलरने असा काही बॉल टाकला की विकेट टाकणं भाग पाडलं. विराटला आऊट केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोयं. या 19 वर्षीय बॉलरचही तोंडभरून कौतूक केलं जातंय. आरोन हार्डी असं या अल्पवयीन बॉलरचं नावं आहे.

कॉट अॅण्ड बॉल आऊट 

विराटला आऊट केल्याचा क्षण या अल्पवयीन खेळाडूसाठी किती महत्त्वाचा आहे याचा अंदाज आपल्याला हा व्हिडिओ पाहून येऊ शकतो. विराटचा विकेट घेणं म्हणजे कोणतातरी मोठ खजाना हाती लागल्याचं समाधान या आरोन हार्डीच्या चेहऱ्यावर दिसतंय. सराव सामन्या दरम्यान त्याने विराटचा विकेट घेण्याचा पराक्रम केलायं. हार्डीने विराटला कॉट अॅण्ड बॉल आऊट केलंय. हा विकेट जाण्याआधीच्या बॉललाच विराटने एक सुंदर कव्हर ड्राइव्ह खेळला होता. 

78 बॉलमध्ये अर्धशतक

 विराट कोहलीने 78 बॉलवर असताना फोर मारून आपलं अर्धशतक पूर्ण केलं. आपल्या संपूर्ण खेळात त्याने 87 बॉल्सचा सामना केला ज्यामध्ये त्याने 64 रन्स बनविले. यावेळी त्याने 7 फोर आणि 1 सिक्स ठोकला. विराट जेव्हा आऊट झाला तेव्हा भारताचा स्कोअर 200 रन्स वर पोहोचला होता. आऊट होण्याआधी त्याने पुजारा सोबत अर्धशतकीय भागीदारी केली होती.