मुंबई : आयपीएलमधील 30 वा सामना कोलकाता विरुद्ध राजस्थान या टीममध्ये खेळवण्यात आला. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी दोन्ही टीममध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. सोमवारी राजस्थाननं कोलकातावर रोमांचक विजय मिळवला. कोलकाताचा हा आयपीएलमधील 150 वा सामना होता.
कोलकाता टीमसाठी खास असलेला हा सामना टीमने हातचा गमवला. टीममधील दिग्गज खेळाडू सुनील नरेननं अजब रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवला आहे. मैदानात उतरताच त्याच्या नावावर या रेकॉर्डची नोंद करण्यात आली. हा रेकॉर्ड कोलकाताच्या कोणत्याच खेळाडूनं आजवर केला नाही.
हा सामना न खेळताच सुनील नरेनला मैदानातून आल्या पावली परत जाण्याची वेळ आली. त्याला एकही बॉल खेळता आला नाही. सर्वात जास्त कोलकाता टीमसाठी खेळणाऱ्यांमध्ये सुनील नरेन, गौतम गंभीर आणि युसूफ पठाण यांचं नाव येतं. त्यांनी कोलकातासाठी 122 सामने खेळले आहेत.
एवढ्या वर्षात असं कधीच घडलं नव्हतं ते राजस्थान विरुद्धच्या सामन्यात घडलं. सुनील नरेन मैदानात उतरताच रनआऊट झाला. त्याला एकही बॉल न खेळता तंबुत आल्या पावली परत जावं लागलं.
कोलकाता नाईट रायडर्सने यंदाच्या मेगा ऑक्शनपूर्वी सुनील नरेनला 6 कोटी देऊन रिटेन केलं. सुनील नरेनने कोलकाता नाईट रायडर्सकडून एकूण 150 सामन्यांमध्ये 165 विकेट घेतल्या आणि 977 धावा केल्या आहेत.
सुनील नरेनचे नाव आयपीएलमधील सर्वात यशस्वी बॉलर्सच्या यादीमध्ये आहे. त्याच्या गुगली बॉलला फलंदाजही घाबरतात. सुनील नरेन हा कोलकाता नाईट रायडर्सकडून ओपनिंग फलंदाज म्हणून खेळला आहे.
कोलकाताच्या 150 व्या सामन्यात सुनील ओपनिंगसाठी मैदानात उतरला आणि एकही बॉल न खेळता रन आऊट झाला. त्यामुळे त्याला तंबुत परतावं लागलं. सुनील नरेनला खेळण्याची संधीच मिळाली नाही.
ऐतिहासिक सामन्यात राजस्थाननं कोलकातावर विजय मिळवला. राजस्थाननं पहिल्यांदा फलंदाजी करत 217 धावा केल्या. कोलकातासमोर 218 धावांचं लक्ष्य ठेवलं. कोलकाता टीम 210 धावा करून तंबुत परतली. युजवेंद्रने 4 ओव्हरमध्ये 40 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या.