नवी दिल्ली : क्रिकेटमध्ये अनेकदा इच्छा नसतानाही असे काही रेकॉर्ड्स बनतात ज्यामुळे मैदानाबाहेर बसलेल्या प्रेक्षकांसाठी विनोदाचा विषय ठरतो. हे रेकॉर्ड्स करण्याची कुठल्याही क्रिकेटरची इच्छा नसते आणि कुणीही लक्षातही ठेऊ इच्छित नाही.
असाच एक रेकॉर्ड महिलांच्या क्रिकेट मॅचमध्ये पहायला मिळाला. महिला अंडर-१९ क्रिकेट मॅचमध्ये अनोखा रेकॉर्ड झाला आहे.
मणिपूर आणि नागालँड या दोन टीम्समध्ये मॅच सुरु होती. या वन-डे मॅचमध्ये वाईड बॉल्स टाकण्याच्या एका अनोख्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. इतकेच नाही तर, दोन्ही टीम्सच्या बॅट्समनने केलेल्या स्कोरपेक्षा अधिक रन्स हे वाईड बॉल्समुळे मिळाले.
गुरुवारी मणिपूर आणि नागालँड यांच्यात झालेल्या या मॅचमध्ये एकूण १३६ वाईड बॉल्स टाकण्यात आले. या मॅचमध्ये मणिपूरच्या टीमने ९४ तर नागालँडच्या टीमने ४२ वाईड बॉल्स टाकले.
नागालँडच्या महिला टीमने ११७ रन्सने मॅच जिंकत चार पॉईंट्स मिळवले. नागालँडच्या टीमने ३८ ओव्हर्समध्ये २१५ रन्स ऑल आऊट झाली ज्यामध्ये ९४ रन्स हे केवळ वाईड बॉल्स टाकल्यामुळे मिळाले. वाईड बॉल्समुळे मणिपूरच्या बॉलर्सला १५.४ ओव्हर्स अधिक टाकाव्या लागल्या.
यानंतर मैदानात आलेल्या मणिपूरच्या टीमने २७.३ ओव्हर्समध्ये केवळ ९८ रन्स करता आले. तर, नागालँडच्या टीमने ४२ वाईड बॉल्स टाकले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅचेसमध्ये सर्वाधिक वाईड बॉल्स टाकण्याचा रेकॉर्ड भारत आणि केनिया यांच्यात झालेल्या वन-डे मॅचमध्ये झाला होता. २३ मे १९९९ मध्ये खेळण्यात आलेल्या या मॅचमध्ये ५२ वाईड बॉल्स टाकण्यात आले होते. यामध्ये भारताकडून ३१ तर केनियाच्या टीमकडून २१ बॉल्स वाईड टाकले होते.