आज महाराष्ट्र होणार फुटबॉलमय...

पुढील महिन्यात भारतात होणाऱ्या १७ वर्षांखालील फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या वातावरण निर्मितीसाठी महाराष्ट्रात आज दहा लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी फुटबॉल खेळणार आहेत.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 15, 2017, 09:53 AM IST
आज महाराष्ट्र होणार फुटबॉलमय...  title=
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

मुंबई : पुढील महिन्यात भारतात होणाऱ्या १७ वर्षांखालील फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या वातावरण निर्मितीसाठी महाराष्ट्रात आज दहा लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी फुटबॉल खेळणार आहेत. सकाळी साडेनऊ वाजता मुंबई जिमखाना, फोर्ट येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या फुटबॉल महोत्सवाचे उदघाटन होणार आहे. बॉम्बे जिमखाना येथे आठ वेगवेगळे सामने होणार आहेत. 

संपूर्ण मुंबई शहरात जवळपास तीन लाखांहून अधिक मुले-मुली विविध ठिकाणी फुटबॉल खेळणार आहेत. त्यासाठी शाळा-महाविद्यालयांमधील मैदानांव्यतिरिक्त सुमारे २०० अधिक मैदानांची आखणी करण्यात आली आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये फुटबॉल खेळला जाणार असल्याने महाराष्ट्र फुटबॉलमय वातावरण निर्माण होणार आहे. अशा प्रकारचा कार्यक्रम करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार आहे.