मुंबई : आपण श्रीमंत व्हावे ही प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. यासाठी अनेक जण प्लानिंग करतात. त्यासोबतच गुंतवणुकीसाठीचेही विविध मार्ग शोधत असतात. नुकतीच फोर्ब्स मॅगॅझिनने जगातील श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली. या यादीत २१ वर्षांपासून ते ९९वर्षापर्यंतच्या व्यक्तींचा समावेश आहे.
आपली मेहनत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर या व्यक्ती अब्जाधीश बनल्यात. असे असले तरी या व्यक्तींच्या मागे आणखी एक मोठा फॅक्टर आहे तो म्हणजे न्यूमरोलॉजी.
श्रीमंत होण्यासाठी मेहनत आणि इच्छाशक्ती हवीच मात्र त्याबरोबर नशिबाची साथ असणेही गरजेचे असते. एका वेबसाईटने फोर्ब्सच्या नव्या लिस्टमध्ये कमी वयाच्या अब्जाधीशांची नावे आणि त्यांचा जन्मदिवस याचा रिपोर्ट तयार केलाय. रिपोर्टमध्ये कोणत्या दिवशी जन्मणाऱ्या व्यक्ती कमी वयात अब्जाधीश बनतात हे सांगण्यात आलंय.
कमी वयातील अब्जाधीशचे नाव आहे नॉर्वेचा अलेक्झांड्रा अँडरसन आहे. वयाच्या २१व्या वयात तो अब्जाधीश बनलाय. त्याच्याकडे ९७५० कोटी रुपयांची संपत्ती आहे. तसेच पेटीएमचे फाऊंडर ३७ वर्षीय विजय शेखर शर्मा भारतातील सर्वात कमी वयाचे अब्जाधीश आहेत.
ज्योतिषाचार्य डॉ. दीपक शुक्ला यांच्या मते न्यूमरोलॉजीचे लोकांच्या जीवनात मोठे महत्त्व असते. शुक्रवारी ज्या व्यक्तींचा जन्म होतो त्या व्यक्ती सर्वाधिक श्रीमंत असतात. फोर्ब्सच्या लिस्टमध्ये सर्वात कमी वयाच्या श्रीमंताच्या यादीत शुक्रवारी जन्मलेल्यांची संख्या अधिक आहे.
पॅट्रिक कोलिसन, लुकास वॉल्टन, आचार्य बालकृष्ण आणि कलानिधी मारन यासारख्या अब्जाधीशांचा जन्म शुक्रवारी झाला. दुसऱ्या स्थानावर रविवार येतो. या दिवशी विजय शेखर शर्मा, कॅथरीना अँडरसन यांच्या
शुक्रवार: 25 टक्के
रविवार: 20 टक्के
सोमवार: 17.5 टक्के
बुधवार: 15 टक्के
मंगलवार: 12.5 टक्के
गुरूवार: 10 टक्के
शनिवार: टॉप 40 म्ध्ये कोणी नाही
राशींनुसार जगातील टॉप १०० श्रीमंतांमध्ये सर्वाधिक व्यक्ती कुंभ राशीच्या आहेत. टॉप १० श्रीमंतांच्या यादीत कुंभ राशीच्या व्यक्तींची संख्या १३ टक्के आहे.
कुंभ 12.5 टक्के
वृषभ 10.3 टक्के
मकर: 10 टक्के
सिंह: 9.8 टक्के
वृश्चिक: 9.2 टक्के
धनु: 8.6 टक्के
मिथुन: 7.8 टक्के
मीन: 6.9 टक्के
कन्या: 6.7 टक्के
मेष: 6.2 टक्के
तुला: 6.1 टक्के
कर्क: 5.9 टक्के
नोट : फोर्ब्सने हा सर्वे १९९६ ते २०१५ पर्यंत दरवर्षी टॉप १०० श्रीमंतांच्या यादीवर आधारित केला होता.