Ganesh Chaturthi : गणेश चतुर्थीला चंद्र का पाहू नये? चुकून चंद्र पाहिलाच तर काय करावं? चंद्रोदयाच्या वेळी चंद्र जाणून घ्या

Ganesh Chaturthi : घरातील ज्येष्ठ मंडळी कायम सांगता गणेश चतुर्थीला चंद्र पाहू नये, नाहीतर चोरीचा आळ येतो किंवा कुठलं संकट ओढावतं. काय आहे यामागील कथा आणि चुकून चंद्र दिसला तर काय करायचं जाणून घ्या. 

नेहा चौधरी | Updated: Sep 7, 2024, 01:44 PM IST
Ganesh Chaturthi : गणेश चतुर्थीला चंद्र का पाहू नये? चुकून चंद्र पाहिलाच तर काय करावं? चंद्रोदयाच्या वेळी चंद्र जाणून घ्या title=
Why not see the moon on Ganesh Chaturthi What to do if you see the moon by mistake

Ganesh Chaturthi : गणेश चतुर्थी हा सण अत्यंत शुभ मानला जातो. गणेश चतुर्थी मोठ्या थाट्यामाट्यात साजरी करण्यात येत आहे. आजच्या चंद्राचे विशेष महत्त्व आहे. आज जर तुम्ही चुकूनही चंद्राकडे पाहिले तर तुम्हाला श्रीगणेशाचा शाप मिळेल आणि परिणामी तुम्हाला खोटा कलंक लागण्याची शक्यता आहे, अशी आख्यायिका आहे. गणेश चतुर्थीला चंद्र दर्शनाचे नियम आणि चंद्रदर्शनाचे महत्त्व जाणून घेऊया.

तुम्हाला माहितीये गणेश चतुर्थीला चंद्र पाहिल्यानंतर भगवान श्रीकृष्णांवरही खोटा कलंक लागला होता. भविष्य पुराण आणि गणेश पुराणात भाद्र शुक्ल चतुर्थीच्या तिथीबद्दल सांगितले आहे की या दिवशी चंद्राकडे पाहिल्यास माणसावर खोटा कलंक लागतो कारण चंद्राला गणेशाचा शाप आहे. खरे तर एकदा भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणपती जेवल्यानंतर हातात मोदक घेत असताना गणेशाचे गजमुख रूप पाहून चंद्र हसला. यामुळे संतप्त होऊन गणेशाने चंदला शाप दिला की, तुला तुझ्या रूपाचा मोठा अभिमान असल्याने यापुढे तुला कोणीही पाहणार नाही आणि जो तुला पाहील त्याची बदनामी होईल.

शाप मिळताच चंद्रदेव दुःखी झाले आणि गणेशजींकडे क्षमा मागू लागले. मग देवांच्या समजूतीने गणेशजींचा राग शांत झाला आणि त्यांनी शापाचा प्रभाव कमी केला आणि सांगितलं की, आतापासून फक्त भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला जो कोणी तुला पाहील त्याला कलंक लागेल. तेव्हापासून गणेशाचा हा शाप चंद्रासोबत सुरू आहे. पण संकष्टी चतुर्थीला तुझा चेहरा पाहिल्याशिवाय भक्तचं व्रत पूर्ण होणार नाही. 

चुकून चंद्र दिसला तर काय करावं? 

या शापाचे परिणाम टाळण्याचा एकमेव उपाय म्हणजे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला फळे, मिठाई किंवा दही यासोबत चंद्र पाहणे. तसंच गणेशाची पूजा करावी. चुकून जर चंद्र पाहिला तर भक्ताने गणेशाचे नमन करावं. त्या दिवशी गणपतीच्या मंत्राचा जप करावा किंवा गणेश अथर्वशीर्ष पठण करावं. 

त्याशिवाय जो व्यक्ती संपूर्ण भाद्रपद महिन्यात नियमितपणे चंद्र पाहतो त्यालाही हा दोष लागत नाही. 

गणेश चतुर्थी दर्शनाची वेळ मुंबई - रात्री 8:15

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)