Akshaya Tritiya 2023 Gold : अतिशय शुभ आणि साडेतीन मुहूर्ता पैकी एक असा अक्षय्य तृतीया सण शनिवारी 22 एप्रिल 2023 ला आज साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी कुठल्याही कार्यासाठी शुभ मुहूर्त पाहण्याची गरज नसतं इतक्या हा दिवस शुभ असतो. या दिवशी सोने खरेदी करणं अतिशय शुभ मानलं जातं. त्यामुळे अक्षय्य तृतीला सोने खरेदी करण्यासाठी महिलावर्गामध्ये एक वेगळाच उत्साह दिसून येतो.
पण तुम्हाला माहिती का की अक्षय्य तृतीयेलाच का सोनं खरेदी केलं जातं. चला आज आपण याबद्दल जाणून घेऊयात. त्याशिवाय सोने खरेदीचा शुभ मुहूर्त आणि शहरानुसार शुभ वेळ आणि ऑफरबद्दल माहिती करुन घ्या.
धार्मिक ग्रंथात आणि पौराणिक कथेनुसार वैशाख शुक्ल तृतीया तिथीला ब्रह्मदेवाचा पुत्र अक्षय कुमारचा जन्म झाला होता. म्हणून या तिथीला अक्षय्य तृतीया असं म्हटलं जातं. हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की, या दिवशी केलेले कोणतही कामं हे चतुर्थी फळ देणारे आणि चिरंतर टिकणारे असतं. तर सोनं हे लक्ष्मीचं रुप मानलं जातं. त्यामुळे घरामध्ये कायम लक्ष्मीचा वास राहावा आणि घरात सुख समृद्धी नांदावी म्हणून अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी केलं जातं.
आता आपण जाणून घेऊयात या शुभदिनी कुठल्या वेळीत खरेदी केल्यास आपल्याला अधिक लाभ होईल. महिलांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण यंदा सोने खरेदीसाठी अख्खा दिवस हा शुभ आहे.
सकाळचा मुहूर्त (शुभ) - 22 एप्रिल 2023 ला सकाळी 07:49 वाजेपासून 09:04 वाजेपर्यंत
दुपारचा मुहूर्त (चार, लाभ, अमृत) - 22 एप्रिल 2023 ला सकाळी 12:20 वाजेपासून संध्याकाळी 05:13 वाजेपर्यंत
संध्याकाळचा मुहूर्त (लाभ) - 22 एप्रिल 2023 ला संध्याकाळी 06:51 वाजेपासून रात्री 08:13 वाजेपर्यंत
रात्रीची वेळ (शुभ, अमृत, चार) - 22 एप्रिल 2023 ला रात्री 09:35 वाजेपासून रात्री 01:42 वाजेपर्यंत
उषाकाल मुहूर्त (लाभ) - 23 एप्रिल 2023 ला पहाटे 04:26 वाजेपासून पहाटे 05:48 वाजेपर्यंत
नवी दिल्ली - सकाळी 07:49 ते दुपारी 12:20 पर्यंत
नोएडा - सकाळी 07:49 ते दुपारी 12:19 पर्यंत
गुरुग्राम - सकाळी 07:49 ते दुपारी 12:21 पर्यंत
चंदीगड - सकाळी 07:49 ते दुपारी 12:22 पर्यंत
अहमदाबाद - सकाळी 07:49 ते दुपारी 12:38 पर्यंत
मुंबई - सकाळी 07:49 ते दुपारी 12:37 पर्यंत
पुणे - सकाळी 07:49 ते दुपारी 12:33 पर्यंत
बेंगळुरू - सकाळी 07:49 ते दुपारी 12:18 पर्यंत
हैदराबाद - सकाळी 07:49 ते दुपारी 12:15 पर्यंत
चेन्नई - सकाळी 07:49 ते दुपारी 12:08 पर्यंत
कोलकाता - सकाळी 05:10 ते सकाळी 7:47 (23 एप्रिल)
मलाबार गोल्ड एंड डायमंड्सने (Malabar Gold and Diamonds Akshaya Tritiya 2023 Offers) ग्राहकांना गोल्ड आणि डायमंड दागिन्यांचा मेकिंगवर 50 टक्केपर्यंत सूट जाहीर केली आहे. याशिवास 30,000 रुपये ते अधिक गोल्ड ज्वेलरी खरेदी केल्यास तुम्हाला 100 mg गोल्ड क्वाइन फ्री मिळणार आहे.
तर तनिष्कने अक्षय्य तृतीया 2023 ला (Tanishq Akshaya Tritiya 2023 Offers) ग्राहकांना मेकिंग पर 25 टक्क्यांचा डिस्काउंट ऑफर दिला आहे. तुम्हाला हा लाभ 24 एप्रिल 2023 पर्यंत घेता येणार आहे. पीसी चंद्रा ज्वेलर्स(PC Chandra Jewellers Akshaya Tritiya 2023 Offers) ने मेकिंगवर 15 मे 2023 पर्यंत 15 टक्के डिस्काउंट दिलं आहे.