मुंबई : प्रत्येक पूजेत नारळाला अनन्य साधारण महत्व आहे. नारळाला श्रीफळ देखील म्हटलं जातं. प्रत्येकवेळेला नारळाला पहिला मान आहे. अशा नारळाबद्दल आज आपण जाणून घेऊया.
नारळ हे फक्त फळ नाही. धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्व आहे. काहीजण नारळाला सजीव रूप देखील मानतात. नारळाला मनुष्याप्रमाणे 2 डोळे आहेत. एक तोंड देखील आहे. नारळ फोडल्यावर त्यातून पाणीच येते. ते अमृतासमान मानले जाते. नारळाला शास्त्रानुसार श्रीफळ म्हटले जाते. म्हणजेच श्रीलक्ष्मीचे फळ मानल जाते. यामुळेच प्रत्येक पूजा कार्यात नारळाला खूप महत्व आहे.
नारळाला हिंदू धर्मातील पूजा, यज्ञ, हवन सारख्या गोष्टीत खूप महत्व आहे. हवनात कायमच नारळ दिला जातो. प्रसादाच्या रुपातही नारळ दिला जातो. अशी आख्यायिका आहे की, भगवान विष्णू आपल्यासोबत देवी लक्ष्मी, कामधेनू आणि नारळ हे संसाराकरता घेऊन आले होते. तसेच नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष देखील म्हटले जाते. नारळ प्रत्येकाची मनोकामना पूर्ण करतो.
पौराणिक कथेनुसार इंद्रदेवावर महर्षि विश्वामित्र रागावले. त्यांनी वेगळा स्वर्ग निर्माण केला. या स्वर्ग निर्मितीमधून ते संतुष्ट झाले नाही तेव्हा त्यांनी एका वेगळ्या पृथ्वीची निर्मिती केली. त्यावेळी सर्वात प्रथम त्यांनी मनुष्याच्या रुपात नारळाची निर्मिती केली. म्हणून नारळाला मनुष्याच्या रुपात पाहिले जाते.
पूर्वी कर्मकांड आणि हवनमध्ये बळी देण्याची प्रथा होती. बळी कधी स्वतःचा असायचा किंवा आपल्या प्रिय व्यक्तीचा. हळू हळू ही प्रथा बंद झाली. फक्त पशुंचा बळी देण्याची प्रथा सुरू राहिली. त्यावेळी देवांना प्रसन्न करण्यासाठी मनुष्य रुपी असलेल्या नारळाची प्रथा सुरू झाली.
नारळ हे एक बी फळ आहे. स्त्री बीज रुपातच बाळाला जन्म देते. यामुळे गर्भधारणे संदर्भातील मनोकामना पूर्ण करण्यासाठी नारळाला सक्षम समजले दाते. या कारणामुळेच स्त्रीला नारळ फोडण्यापासून रोखलं जातं. स्त्री जेव्हा नारळ फोडते तेव्हा तिच्या बाळाला कष्ट होते असे समजले जाते.
नारळाला कल्पवृक्ष समजले जाते. कारण नारळ प्रत्येक आजारावर रामबाण उपाय आहे. नारळ शक्तीवर्धक असून त्याचा खूप उपयोग होते. नारळ या फळाचा त्याच्या पानांचा खूप वापर होतो. नारळातील प्रत्येक गोष्टीचा वापर होते. नारळाला यामुळेच धार्मिक गोष्टीत पवित्र मानलं जातं.