Weekly Horoscope : 'हा' आठवडा कुठल्या राशीसाठी ठरेल भाग्यशाली, तर कोणाला करावा लागणार अडचणीचा सामना?

Weekly Horoscope : रविवारी मकरसंक्रात साजरी करण्यात आली...सूर्य राशीने मकर राशीत प्रवेश केला आहे. म्हणजे रविवारपासून रात्र मोठी होणार आणि दिवस लहान...त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. 

Updated: Jan 16, 2023, 08:17 AM IST
 Weekly Horoscope  : 'हा' आठवडा कुठल्या राशीसाठी ठरेल भाग्यशाली, तर कोणाला करावा लागणार अडचणीचा सामना? title=
weekly horoscope saptahik rashifal 16 to 22 january 2023 all zodiac signs Horoscope 16 January 2023

Weekly Horoscope (16-22 Jan) : रविवारी देशभरात मोठ्या उत्साहात मकरसंक्रांत साजरी करण्यात आली ...वर्षाच्या सुरुवातीला येणारा पहिला सण.  मकर संक्रांत म्हणजे सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. अशावेळी ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींवर याचा परिणाम दिसून येतो. 

मेष (Aries)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभयोग घेऊन आला आहे.  नशीब तुमची साथ देईल. नोकरदारांसाठी हा आठवडा अनुकूल असणार आहे. धनलाभ आणि प्रगतीच्या संधी मिळणार आहेत.  तर नोकरदार महिलांसाठी हा आठवडा अतिशय शुभ आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. आरोग्य सामान्य राहील आणि वैवाहिक जीवन आनंदी राहील.

वृषभ (Taurus)

या राशीच्या लोकांनी या आठवड्यात आरोग्य आणि नातेसंबंधांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. जुना आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे. तुम्हाला हॉस्पिटलच्या पायऱ्या चढावा लागतील. नातेवाईकांचे अपेक्षित सहकार्य लाभणार नाही.  प्रतिस्पर्ध्यांकडून कठीण स्पर्धेला सामोरं जावं लागू शकतं. प्रेमसंबंधात काळजी घ्या. 

मिथुन (Gemini)

या राशीसाठी हा आठवडा संमिश्र असणार आहे. प्रगतीच्या अनेक संधी चालून येतील पण आरोग्य किंवा घरगुती समस्यांमुळे त्याचा लाभ घेता येणार नाही. या आठवडात खिशाला चोट बसण्याची शक्यता आहे. तुमचं बजेट बिघडू शकतं. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करावी लागेल. वैवाहिक जीवन छोट्या छोट्या वादांसह सामान्य असेल. 

कर्क (Cancer)

या आठवड्यात नियोजित काम करण्यासाठी अतिरिक्त मेहनत आणि वेळेचं नियोजन करावे लागणार आहे. प्रवासादरम्यान आपल्या सामानाची आणि आरोग्याची विशेष काळजी घ्या. कामाचा ठिकाणी टार्गेट पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ आणि कनिष्ठ लोकांशी संवाद साधावा लागणार.  अनावश्यक गोष्टींवर पैसे वाया घालवू नका अन्यथा कर्ज मागण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. विवाहिक जीवनात साथीदाराची साथ मिळेल. 

सिंह (Leo)

हा आठवडा या राशीच्या लोकांसाठी थोडे दुःख आणि थोडे आनंद घेऊन येणार आहे. आरोग्याशी संबंधित काही समस्यांना सामोरे जावं लागेल. करिअर आणि व्यवसायातून चांगली बातमी मिळणार आहे.  प्रभावशाली व्यक्तीशी भेट होईल. महिलांना घरात कामाचा ताण जाणवेल. पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. वैवाहिक जीवन आनंदी राहील. 

कन्या (Virgo)

नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताण जाणवेल.  जमीनसंदर्भातील वाद कोर्टा घेऊन जाण्याऐवजी वाटाघाटीने सोडवा. कामात येणाऱ्या अडचणी दूर होती. नातेवाईकांचं सहकार्य मिळेल.  जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. या आठवड्यात तुम्ही कामात व्यस्त असणार आहात. 

तुळ (Libra)

तुळ राशीसाठी हा आठवडा शुभ असणार आहे.  या आठवडात तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळेल.  तुम्ही खूप दिवसांपासून जमीन आणि इमारतींची खरेदी-विक्री करण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात तुम्हाला त्यात यश मिळू शकतं. डॉक्टर, वकील, सल्लागार, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी हा आठवडा शुभ आहे. प्रेमसंबंध मजबूत होती. या आठवड्यात अनेक आनंदाचे क्षण येणार. 

वृश्चिक (Scorpio)

कामाच्या ठिकाणी विरोधकांपासून सावध राहा. कौटुंबिक संबंधित कोणतीही समस्या या आठवड्यात तुमच्या चिंतेचं मोठं कारण ठरणार आहे. या आठवड्यात कोणावरही खोटे आरोप किंवा निंदा करणे टाळा. नाही तर ते तुमच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवू शकतात. परीक्षा-स्पर्धेच्या तयारीत गुंतलेल्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळेल. प्रेमसंबंध सामान्य राहतील. आरोग्याची काळजी घ्या.

धनु (Sagittarius)

हा आठवडा खूप आनंद आणि लाभ घेऊन आला आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला चांगली ऑफर मिळू शकते. नोकऱ्या लोकांसाठी उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत बनतील. राजकारणाशी संबंधित लोकांचा समाजात सन्मान वाढेल.  प्रेमसंबंध दृढ होतील आणि प्रेम जीवन चांगले जाईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. 

मकर (Capricorn)

हा आठवडा मकर राशीसाठी सुख-समृद्धी घेऊन येणार आहे. तुमची बढती किंवा तुमच्या इच्छित ठिकाणी बदली होण्याची शक्यता आहे. नोकरदार महिलांच्या जीवनात येणारे अडथळे दूर होतील.  भूतकाळात तुम्ही केलेले परिश्रम आणि प्रयत्नांचे या आठवड्यात सुखद परिणाम मिळतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील. 

कुंभ (Aquarius)

हा आठवडा कुंभ राशीसाठी अधिक शुभ आणि सौभाग्य देणारा आहे. या आठवड्यात तुमच्या सन्मानात लक्षणीय वाढ होईल. भविष्यात लाभदायक योजनेत सहभागी होण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा आठवडा शुभ राहील. तुमच्या जोडीदारासोबत आनंदाने वेळ घालवण्याच्या अनेक संधी तुम्हाला मिळतील. आरोग्य सामान्य राहील.

मीन (Pisces)

धन आणि प्रगतीच्या दृष्टीने हा आठवडा मीन राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ असणार आहे. नोकरदारांनाही करिअरमध्ये प्रगती करण्याची संधी मिळेल. लोकांचा तुमच्यावरील विश्वास वाढेल. आठवड्याच्या उत्तरार्धात अचानक लांब किंवा कमी अंतराचा प्रवास होण्याची शक्यता आहे. किरकोळ समस्या सोडल्यास एकूणच आरोग्य सामान्य राहील. प्रेमसंबंध मजबूत होतील आणि जोडीदाराशी सुसंवाद वाढेल.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)