Vipreet Rajyog : 'या' राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना खूपच खास; अचानक धनलाभ होण्याची शक्यता !

Vipreet Rajyog : सप्टेंबर महिना काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. विपरीत राजयोग त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी घेऊन येणार आहे.   

नेहा चौधरी | Updated: Aug 22, 2023, 05:25 AM IST
Vipreet Rajyog : 'या' राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना खूपच खास; अचानक धनलाभ होण्याची शक्यता ! title=
Vipreet rajyoga guru gochar vakri in september these zodiac signs crisis

Vipreet Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर एका राशीत दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. सप्टेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात समृद्धीचा कारक गुरु ग्रह वक्री होणार आहे. अशा स्थितीत विपरीत राजयोग तयार होतो आहे. ( Vipreet rajyoga guru gochar vakri in september these zodiac signs crisis)

विपरीत राजयोग कधी तयार होतो?

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील सहाव्या, आठव्या, बाराव्या घरातील स्वामी संयोग बनवतात तेव्हा विपरीत राजयोग निर्माण होणार आहे. खरं तर ज्योतिषशास्त्रात तिहेरी घरं शुभ मानली जात नाहीत, मात्र विशिष्ट परिस्थितीमुळे असा योगही शुभ परिणाम देतात. मुख्यतः तीन घरांपैकी एकाचा स्वामी स्थित असतो तेव्हा विपरीत राजयोग निर्माण होता. 

ज्योतिषशास्त्रानुसार 22 एप्रिल 2023 ला गुरुने मीन राशीतून मेष राशीत गोचर केला आहे.  दुसरीकडे, मेष राशीत गुरूच्या आगमनापूर्वी राहूचा योग जुळून आल्याने गुरु-चांडाळ दोष तयार झाला आहे. आता देवगुरु गुरु 4 सप्टेंबर 2023 ला सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास वक्री स्थितीत येणार आहे. तर 31 डिसेंबर 2023 ला सकाळी तो प्रतिगामी स्थितीतून बाहेर येणार आहे. गुरु वक्रीमुळे 31 डिसेंबर 2023 पर्यंत काही राशींवर धनवर्षावर होणार आहे. 

मेष (Aries)

या राशीच्या लोकांसाठी बृहस्पति प्रतिगामी होणे अत्यंत शुभ ठरणार आहे. यावेळी तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे.  तुमची रखडलेली कामं पूर्ण होणार आहेत. तसंच तुम्हाला करिअर आणि बिझनेसमध्ये चांगला नफा मिळणार आहे.  या काळात तुम्हाला भरपूर पैसा मिळणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी नवीन नोकरीचा सुवर्ण संधी चालू येणार आहे. या काळात तुम्ही धार्मिक कार्यात रुची घेणार आहात. 

कर्क (Cancer)

या राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना खूप शुभदायक ठरणार आहे. बृहस्पति प्रतिगामी असणे या राशीच्या लोकांसाठी वरदाना ठरणार आहे. गुरूच्या हालचालीतील हा बदल तुमच्या कुंडलीच्या दहाव्या घरात तयार होतो आहे. या काळात करिअर आणि व्यवसायात प्रगतीची घेऊन येणार आहे. बृहस्पतिच्या प्रतिगामीमुळे कर्क राशीच्या लोकांचा समाजात मान-सन्मान वाढणार आहे. 31 डिसेंबर 2023 पर्यंत तुमचं अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळणार आहे. त्यांना नोकरी मिळण्याची शुभ योग जुळून आले आहेत. 

सिंह (Leo)

या राशीच्या लोकांसाठी गुरू प्रतिगामी असणे फायदेशीर ठरणार आहे. सिंह राशीच्या लोकांना मुलांकडून काही चांगली बातमी मिळणार आहे. संशोधनाशी संबंधित असलेल्यांना लोकांची प्रगती होणार आहे.  31 डिसेंबर 2023 पर्यंत काळ तुमच्या साठी भाग्यशाली ठरणार आहे. अनेक दिवसांपासून रखडलेल्या कामांना गती मिळणार आहे. आर्थिक स्थितीत सुधारणार आहेत. कुटुंबातील सदस्यांना अनेक क्षेत्रात प्रगती मिळणार आहे. 

मिथुन (Gemini)

गुरू तुमच्या कुंडलीत उत्पन्नाच्या घरात असणार आहे. त्यामुळे तुम्हाला सर्वाधिक आर्थिक लाभ होणार आहे. कामाच्या ठिकाणी वर्चस्व प्राप्त होणार आहे. अचानक तुम्हाला आर्थिक लाभ झाल्यामुळे बँक बलेन्स  वाढणार आहे. या काळात काही चैनीच्या वस्तू खरेदी तुम्ही करणार आहात. प्रतिगामी बृहस्पति वैवाहिक जीवनासाठी वरदान ठरणार आहे. 

हेसुद्धा वाचा - Budh Vakri 2023 : ग्रहांचा राजकुमार बुध 24 ऑगस्टला वक्री, 4 राशीच्या लोकांचे सुरु होणार वाईट दिवस

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)