Dussehra 2024: शारदीय नवरात्रीच्या महानवमीनंतर म्हणजेच दुसऱ्या दिवशी दसरा म्हणजेच विजयादशमी साजरी केली जाते. हिंदू धर्मात विजयादशमीचे खूप महत्त्व आहे. या दिवशी रामाने रावणावर विजय मिळवला होता म्हणून रामाची पूजा करण्याची प्रथा आहे. इतकंच काय तर या दिवशी रावणाचं दहनदेखील केले जाते. वाईटावर चांगल्याचा विजय, हे प्रतीक मानले जाते. यंदा शनिवारी 12 ऑक्टोबर रोजी दसरा साजरा केला जातो.
दसऱ्याच्या दिवशी घरात दिवा लावण्याची पद्धत अनेक घरांत पाळली जाते. शास्त्रातही दसऱ्याला दिवा लावण्याच्या नियमांबाबत सांगण्यात आले आहे. दसऱ्याच्या दिवशी कधी दिवा लावायचा आणि किती दिवे लावावे, हे आज जाणून घेऊया.
ज्योतिषशास्त्रानुसार, दसऱ्याच्या दिवशी सर्व दिशांना दिवे लावावे. त्यामुळं तुम्ही 10 दिवे लावू शकता. या दिव्यांमध्ये राईचे तेल वापरू सकता. त्या व्यतिरिक्त हिंदू धर्मात तुळस, पिंपळ, शमी, वड आणि केळ्याचं झाड हे पूजनीय आहेत. त्यामुळं तुम्ही या झाडांजवळही दिवा लावू शकता. दसऱ्याच्या दिवशी श्रीरामाची पूजा केली जाते. त्यामुळं तुम्ही तूपाचा दिवाही लावू शकता.
ज्योतिष शास्त्रानुसार, दसऱ्याला पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण व्यतिरिक्त पूर्व-उत्तर (ईशान्य), दक्षिण-पूर्व (अग्नेय), पश्चिम - उत्तर (वायव्य), दक्षिण-पश्चिम (नैऋत्य), उर्ध्व (वरच्या दिशेला) दिवा लावणे खूप शुभ मानलं जातं.
दसऱ्याला दिवा लावणे खूप महत्त्वपूर्ण असते. प्रभू रामासाठी तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी तूपाचा दिवा लावू शकता. त्या व्यतिरिक्त संध्याकाळच्या वेळेस दिवा लावू शकता. संध्याकाळची वेळ खूप शुभ मानली जाते.
ॐ आपदामप हर्तारम दातारं सर्व सम्पदाम,
लोकाभिरामं श्री रामं भूयो भूयो नामाम्यहम !
श्री रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः !
लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम्।
कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये॥
आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदाम्।
लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्।।
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )