शुक्र देव करणार धनु राशीत प्रवेश; 3 राशींच्या व्यक्तींनी राहावं सावधान

धनु राशीत शुक्र प्रवेशामुळे काही लोकांसाठी हा काळ वाईट असणार आहे.

Updated: Oct 29, 2022, 11:20 PM IST
शुक्र देव करणार धनु राशीत प्रवेश; 3 राशींच्या व्यक्तींनी राहावं सावधान title=

मुंबई : यंदाच्या वर्षी डिसेंबरमध्ये अनेक ग्रहांचं परिवर्तन होणार आहे. शुक्राचं सध्या तूळ राशीत भ्रमण आहे. यानंतर तो वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. शिवाय त्यानंतर धनु राशीत प्रवेश करणार आहे. धनु राशीत शुक्र प्रवेशामुळे काही लोकांसाठी हा काळ वाईट असणार आहे.

ज्योतिष शास्त्राप्रमाणे, 18 ऑक्टोबरपासून शुक्र तूळ राशीत प्रवेश करत आहे. दरम्यान याचवेळी, 11 नोव्हेंबरपासून तो वृश्चिक राशीमध्ये संक्रमण करेल. यानंतर 5 डिसेंबर रोजी धनु राशीत प्रवेश करणार आहे. धनु राशीत शुक्राच्या संक्रमणामुळे कोणत्या राशीच्या लोकांसाठी काळ प्रतिकूल असू शकतो, याची माहिती घेऊया

वृषभ

या राशीच्या लोकांसाठी शुक्र हा सहाव्या घराचा स्वामी आहे. यामुळे स्थानिकांना आरोग्याच्या समस्या असू शकतात. अशा परिस्थितीत त्यांच्या आरोग्याची अधिक काळजी घेणं आवश्यक आहे.

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी शुक्र चौथ्या आणि 11व्या घराचा स्वामी आहे. या काळामध्ये तुमची प्रतिमा खराब होऊ शकते. इतर कोणावरही विश्वास ठेवू नका. यावेळी तुम्हाला मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. त्याचप्रमाणे कुटुंबात भांडणं देखील होऊ शकतात.

मकर

शुक्र हा पाचव्या आणि दहाव्या घराचा स्वामी आहे. या जोडप्यांनी अधिक काळजी घेणं आवश्यक आहे. नातेसंबंध बिघडू शकतात. तसंच नुकसान देखील होऊ शकतं. त्यामुळे नीट तुमच्या योजनेनुसार खर्च करा. अन्यथा आर्थिक समस्यांनाही सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. 

( टीप वरील माहिती सामान्य माहितीच्या आधारावर आहे झी २४ तास याची खातरजमा करत नाही )