Kamika Ekadashi 2024 Horoscope : आज आषाढ महिन्यातील कामिनी एकादशीचं व्रत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार आज ग्रह आणि नक्षत्राचे अनेक संयोग जुळून आले आहेत. गजकेसरी योगासह सर्वार्थ सिद्धी योग, ध्रुव योग आणि रोहिणी नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. त्यासोबत संपत्तीचा कारक शुक्रदेव सिंह राशीत गोचर करणार आहे. त्यामुळे याचा फायदा काही राशीच्या लोकांवर होणार आहे. या लोकांना आर्थिक फायदा होणार असे संकेत ज्योतिषशास्त्र तज्ज्ञांनी दिले आहेत.
या राशीच्या लोकांसाठी कामिनी एकादशी लाभदायक ठरणार आहे. श्रीगणेशाच्या कृपेने या राशीच्या लोकांना त्यांच्या जीवनातील समस्यांपासून आराम मिळणार आहे. त्यांची आर्थिक स्थितीही मजबूत होणार आहे. नोकरदार लोकांना त्यांच्या अधिका-यांच्या सहकार्यामुळे चांगली बातमी मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभावही वाढणार आहे. तुमचे एखादे काम खूप दिवसांपासून प्रलंबित असेल तर ते मार्गी लागणार आहे. कुटुंबाच्या कल्याणासाठी तुम्ही काही विशेष निर्णय घेणार आहेत. ज्यामध्ये प्रत्येकजण तुम्हाला साथ देणार आहे.
कामिनी एकादशी या राशीच्या लोकांच्या आयुष्यात नवीन प्रकाश आणणार आहे. या लोकांना नशिबाची साथ मिळणार असून सर्व समस्यांना तोंड देण्याच धैर्य मिळणार आहे. त्यांना त्यांच्या कामात समाधान मिळणार आहे. तुम्हाला कोणत्याही जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावाही मिळणार आहे. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुम्हाला चांगला नफा मिळणार आहे. तुमच्या जोडीदारासोबत तुमचे संबंधही अनुकूल असणार आहेत. रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी चांगली बातमी मिळणार आहे. कौटुंबिक जीवनात काही कारणाने तणाव असेल पण तेही संवादातून सुटणार आहे.
कामिनी एकादशी या राशीच्या लोकांसाठी नवीन प्रेरणा देणार आहे. कन्या राशीच्या लोकांची प्रलंबित कामं पूर्ण होणार असून सरकारी योजनांचा लाभ मिळणार आहे. या राशीचे विद्यार्थी चिकाटीने अभ्यास करणार आहेत. त्यांना त्यांच्या वडिलांचे आणि शिक्षकांचे आशीर्वादही लाभणार आहे. जर तुम्ही कोणत्याही कामाचे नियोजन करत असाल तर तुम्हाला त्यात यश मिळणार आहे. नोकरदार लोकांना एखाद्या कंपनीकडून चांगली ऑफर मिळणार आहे. ज्यामुळे त्यांच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत काही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करणार आहात.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)