तुळस सोबतच 'ही' झाडे सुकणं म्हणजे अशुभ संकेत, मोठ्या संकटाची चाहूल

फक्त तुळसच नाही तर ही झाडंही देतात तुम्हाला संकटापूर्वी चाहूल, तुमच्याही घरी आहेत का यामधील झाडं तर आताच काळजी घ्या

Updated: Jun 11, 2022, 08:12 AM IST
तुळस सोबतच 'ही' झाडे सुकणं म्हणजे अशुभ संकेत, मोठ्या संकटाची चाहूल title=

मुंबई : हिंदू धर्मामध्ये झाडांना पूजनीय स्थान आहे. तुळस आणि यासोबत अशी काही झाडं आहेत ज्यांनी नित्यनियमाने पूजा केली जाते. तुळस किंवा ही झाडं जर सुकायला लागली तर त्याचे अशुभ संकेत मिळतात असं पूर्वपारंपार मानणण्याची परंपरा आहे. ही झाडं नेहमी आपल्याला काहीतरी संकेत देत असतात. भविष्यात होणाऱ्या घटनांचे हे संकेत कसे ओळखायचे याबद्दल जाणून घेऊया. 

तुळस : तुमच्या दारातील तुळस जर सुकली किंवा मरायला टेकली तर ते चांगले संकेत नाहीत. कधी कधी झाडांची पूर्ण काळजी घेतल्यानंतरही ती सुकते. तुळशीचं रोप जर सुकत असेल तर याचा अर्थ आहे तुमच्यावर आर्थिक संकट ओढवू शकतं. माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज आहे. तुळशीचे रोप हे देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि भगवान विष्णूला ते अतिशय प्रिय आहे. त्यामुळे तुळशीच्या रोपाची विशेष काळजी घ्या. 

मनी प्लांट - वास्तु शास्त्रानुसार मनी प्लांटचे रोप खूप शुभ मानले जाते.  वास्तु तज्ज्ञांच्या मते मनी प्लांट आग्नेय दिशेला ठेवणे शुभ असते.  या दिशेला गणेशजींचा वास असल्याने धनाची कमतरता भासत नाही असं मानलं जातं.  पण लावलेलं मनी प्लांट जर सुकलं तर हा संकेत अशुभ आहे. आर्थिकहानी होऊ शकते. पैशांची चणचण भासू शकते. 

शमीचे झाड सुकणे- शमीचे झाड खूप शुभ आहे.  शनी ग्रहाच्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी शमीच्या झाडाची पूजा केली जाते.  पण तुमचे हिरवे शमीचे झाड अचानक सुकले तर हा संकेत वाईट आहे. शनीदेवाचा कोप होऊ शकतो असे मानले जाते. तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.  अशा स्थितीत कामांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतात. 

अशोकाचे झाड- सकारात्मकतेसाठी घराच्या अंगणात अशोकाचे झाड लावले जाते.  हे झाड सुकले तर घरातील शांतता भंग होण्याचे लक्षण आहे.  अशा परिस्थितीत अशोकाच्या झाडाची चांगली काळजी घ्या. जर अशोकाचे झाड सुकले किंवा खराब झाले असेल तर ते लगेच बदललं पाहिजे. 

आंब्याचे झाड सुकवणे- हिंदू धर्मात आंब्याचे झाड खूप शुभ मानले जाते. आंब्याच्या पानांचा उपयोग पूजेच्या विधीमध्येही करतात. अशा स्थितीत आंब्याचे झाड सुकणं म्हणजे भविष्यात येणाऱ्या संकटांचे संकेत देण्यासारखं आहे. त्यामुळे हे वेळीच ओळखून सावध राहायला हवं. 

(Disclaimer:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे. अधिक बातम्यांसाठी फॉलो करा 24 Tass.com )