Vastu Tips : रात्री बेडरूममध्ये झोपताना नवरा-बायकोने 'या' चुका अजिबात करू नये!

चला जाणून घेऊया पती आणि पत्नीने बेडरूममध्ये वास्तूसंदर्भात नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे. 

Updated: Aug 20, 2022, 12:12 PM IST
Vastu Tips : रात्री बेडरूममध्ये झोपताना नवरा-बायकोने 'या' चुका अजिबात करू नये! title=

मुंबई : अनेकदा नवरा आणि बायको यांच्यात अनेकदा विनाकारण वाद होताना दिसतात. या भांडणामागे वास्तू दोष हे एक कारण असल्याचं मानलं जातं. मुख्य म्हणजे हे बेडरूममध्ये झोपण्याच्या पद्धतीशी देखील हे संबंधित असू शकतं.

तुम्ही जर चुकीच्या दिशेने झोपत असाल तर वैवाहिक जीवनात वाद किंवा तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे शकतात. चला जाणून घेऊया पती आणि पत्नीने बेडरूममध्ये वास्तूसंदर्भात नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे. 

वास्तू शास्त्रामध्ये पती आणि पत्नी यांच्यासाठी काही खास नियम देण्यात आले आहेत. या नियमांचं पालन केल्यास वैवाहिक आयुष्य चांगलं आणि सुखमय राहतं. धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यात पत्नीने नेहमी उजव्या बाजूला बसावं, असं शास्त्रात मानलं जातं.

त्याचप्रमाणे, इतर कार्यांमध्ये जसं की, बसताना, झोपताना शिवाय जेवण करताना पत्नीने पतीच्या डावीकडे असायला हवं.

वास्तूशास्त्र काय म्हणतं? 

घरातील कर्त्या पुरुषाने हाय एनर्जी झोनमध्ये म्हणजेच दक्षिण दिशेला झोपावं. त्यामुळे बेडरूममध्ये पलंग अशा दिशेने ठेवा की, झोपल्यावर पती-पत्नीचे पाय दक्षिण दिशेला नसावेत. दक्षिणेकडे डोकं आणि उत्तर दिशेला पाय ठेवणं वास्तूशास्त्रात उत्तम मानलं जातं.

वास्तूशास्त्रात नमूद केल्यानुसार, दक्षिण दिशेला डोकं ठेवून झोपल्यास पती-पत्नीच्या आयुष्यात सुख-समृद्धी येते. तसंच भांडण आणि तंटा राहात नाही. सोबतच घरात कुठल्याही प्रकारे पैशांची अडचणही भासत नाही.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)