'या' गोष्टी तुम्ही पर्समध्ये ठेवत असाल, तर तुम्हीच स्वत:चं नुकसान करताय

पैसे न उरण्यामागचा संबंध तुमच्या पर्सशी देखील असल्याचे वास्तुशास्त्रामध्ये सांगितले जाते.

Updated: Mar 9, 2022, 02:12 PM IST
'या' गोष्टी तुम्ही पर्समध्ये ठेवत असाल, तर तुम्हीच स्वत:चं नुकसान करताय title=

मुंबई : बऱ्याच लोकांच्या बाबतीत या समस्या उद्भवतात की, त्यांनी कितीही मेहेनत केली तरी देखील त्यांच्याकडे पैसा येत नाही किंवा आला तरी तो टिकत नाही. बऱ्याचदा लोक बजेट न ठरवता पैसे खर्च करतात. यामुळे देखील त्यांना पैसा पूरत नाही. परंतु काहीवेळा यासाठी वास्तु शास्त्र देखील कारणीभूत असतं. आपण नकळत अशा बऱ्याचशा अशा गोष्टी करतो. ज्याचा परिणाम लक्ष्मी वरती होतो आणि आपल्याकडे पैसे उरत नाहीत.

पैसे न उरण्यामागचा संबंध तुमच्या पर्सशी देखील असल्याचे वास्तुशास्त्रामध्ये सांगितले जाते. त्यामुळे तुम्ही कोणत्याही गोष्टी तुमच्या पर्स किंवा पॉकिटमध्ये ठेवत असाल, तर ते तुम्हाला थांबवावं लागेल. नाहीतर तुमची पैशांसाठीची तडफड कधीच संपणार नाही.

त्यामुळे आज तुम्ही तुमच्या पर्समध्ये कोणत्या गोष्टी ठेऊ नयेत, याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

अनेकजण पर्समध्ये देवाचा फोटो ठेवतात किंवा असा कोणताही कागद ठेवतात ज्यामध्ये देवाचा फोटो असतो. परंतु ही तुम्ही फार मोठी चूक करताय, कारण असं केल्यानं तुम्ही कर्जाच्या ओझ्याखाली आणखी दबत आहात. जर तुम्हाला हे टाळायचे असेल, तर पर्सबाबत ही चूक कधीही करू नका.

बरेच लोक त्यांच्या पर्समध्ये जुन्या बिल-पावत्यांचे बंडल घेऊन जातात. परंतु त्यांच्या या सवयीमुळे त्यांचे पैसे कमी होतात. त्यामुळे या गोष्टी कधीही पर्समध्ये ठेवू नका.

बरेच लोक पर्समध्ये आपल्या मृत नातेवाईकांचे फोटो ठेवतात, असे करण्यामागे त्यांच्याशी एक भावनिक जोड असते, परंतु पर्समध्ये मृत व्यक्तीचा फोटो ठेवल्याने लक्ष्मी नाराज होते. असे वास्तुशास्त्रामध्ये सांगितले जाते. यामुळे अशा लोकांकडे पैशाची नेहमीच कमतरता असते.

धारदार किंवा टोकदार वस्तू किंवा धातूच्या वस्तू कधीही पर्समध्ये ठेवू नका. ते नकारात्मकता आणतात आणि पैशाचे नुकसान करतात.

फाटलेली पर्स कधीही ठेवू नका. असे केल्याने माता लक्ष्मी क्रोधित होऊन व्यक्ती दरिद्री बनते.

(अस्वीकरण: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)