मुंबई : आपल्याकडे तुळशीला विशेष महत्त्व आहे. तुळशीचे रोप बहुतेक घरांमध्ये आढळते, त्यामागे अनेक कारणे आहेत. अनेक घरांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी तुळशीच्या रोपाची पूजा केली जाते. तुळशीच्या रोपाला आयुर्वेदात देखील फार महत्व आहे. तुळस अनेक आजारांवर औषधी आहे. शास्त्रानुसार तुळशीचे रोप येणाऱ्या काळाचे काही संकेत देते. तसेच वास्तुशास्त्रात अनेक झाडे आहेत, जी घरातील दोष दूर करण्यास मदत करतात. असे म्हटले जाते की, घरात तुळशीचे रोप लावल्याने सकारात्मक उर्जा मिळते. चला जाणून घेऊया तुळशीच्या रोपावरुन घरात घडणाऱ्या गोष्टीचा कसा संबंध लावला जातो.
असे म्हटले जाते की तुळशीचं रोपटं बुधाचे प्रतिनिधित्व करते. कार्तिक महिन्याच्या देवूथनी एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाचा विवाह भगवान विष्णूच्या रूपात शालिग्रामसोबत केला जातो. तुळशी हे माँ लक्ष्मीचे रूप असल्याचे मानले जाते. त्याचबरोबर अनेक लहान-मोठे सण किंवा धार्मिक कार्यक्रमातही तुळशीची विशेष पूजा केली जाते.
असे मानले जाते की तुळशीचे रोप अचानक सुकणे हे घरात संकट येण्याचे संकेत आहे. याचा अर्थ भगवान श्री हरी विष्णू तुमच्यावर कोपले आहेत.
वास्तूनुसार तुळशीची पाने अचानक पडणे देखील अशुभ मानले जाते. पितृदोषामुळे अनेक वेळा तुळशीचे रोप सुकते, त्यामुळे जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. असंही मानलं जातं की घरात सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून होणारे भांडण हे पितृदोषाचे कारण असू शकते.
असे मानले जाते की, जर तुमच्या घरातील तुळशीच्या रोपाजवळ पक्षी घरटे बनवत असेल तर याचा अर्थ तुमच्या कुंडलीतील केतूची स्थिती बिघडली आहे. त्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जातात.
तसेच घराच्या छतावर तुळशीचे रोप ठेवल्याने बुध कमजोर होतो. असे म्हटले जाते की बुध हा धनाचा ग्रह आणि व्यवसायाचा स्वामी आहे. त्यामुळे त्याला तुमच्या घरासमोर ठेवा घराच्या वर नाही.
- एकादशी आणि रविवार सोडून इतर सर्व दिवशी तुळशीला पाणी अर्पण करावे, असे सांगितले जाते.
- असे मानले जाते की तुळशीच्या रोपाची नित्य पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात.
- सकाळ संध्याकाळ तुळशीला दिवे दाखवावेत असे सांगितले जाते.
- घरामध्ये तुळशीचे रोप असेल तर त्याची काळजी घ्या, वेळोवेळी पाणी द्या.