मुंबई : वास्तुशास्त्रामध्ये मुख्य दरवाजापासून घरापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीचे स्थान आणि दिशा यांचं महत्त्व सांगण्यात आलं आहे. त्याच वेळी, घराच्या मुख्य दरवाजाच्या स्थितीचा घरात राहणाऱ्या लोकांच्या जीवनावर खूप प्रभाव पडतो कारण घरामध्ये प्रवेश करणारी सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा मुख्य दरवाजाद्वारेच निर्धारित केली जाते.
आपल्या आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा असावी आणि घरात सुख-शांती नांदावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. अशा स्थितीत वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा उघडण्याची दिशा चुकीची असेल तर तुमच्या जीवनात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. चला जाणून घेऊया मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असणे योग्य आणि कोणत्या दिशेला अशुभ.
वास्तुशास्त्रानुसार, घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला असेल तर घरातील सदस्यांच्या जीवनात संघर्ष निर्माण होतो. दक्षिण दिशा ही यमराजाची दिशा मानली जाते आणि येथूनच पितरांचं आगमन होतं. मुख्य दरवाजा या दिशेला असल्याने घराच्या मुख्या आणि स्त्रिया दोघेही दुःखी होतात. त्यामुळे घराचे मुख्य द्वार दक्षिण दिशेला असणं अशुभ मानलं जातं.
वास्तुशास्त्र सांगतं की, जर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा पश्चिम दिशेला असेल तर ते शुभ परिणाम देतं. या दिशेला मुख्य द्वार असल्यामुळे घरातील लोकांची प्रगती मंदावली असली तरी त्यांना कायमस्वरूपी यश मिळतं.
जर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा उत्तर दिशेला असेल तर ते सर्वात शुभ मानलं जातं. देवतांचा वास उत्तर दिशेला असतो. या दिशेला मुख्य दरवाजा असल्याने घरात अध्यात्मिक वातावरण राहतं.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)