Lal Kitab Totke Upay: हिंदू धर्मात हळद ही शुभ कार्यात वापरली जाते. पूजाविधी, लग्न कार्यात हळदीचं विशेष महत्त्व आहे. हळदीचा संबंध भगवान विष्णु आणि देवगुरु बृहस्पति यांच्याशी जोडला गेला आहे. आयुर्वेदातही हळदीचं महत्त्व अधोरेखित होतं. यावरून हळद किती महत्त्वाची आहे हे कळतं. पूजेत हळदीचा तिलक लावणे असो की, हळदीची गाठ जवळ बाळगणं असो शुभ मानलं जातं. हळदीचे काही तोडगे प्रभावी ठरतात. ज्योतिषशास्त्र आणि लाल किताबात हळदीचे काही प्रभावी उपया देण्यात आले आहेत. यामुळे आयुष्यातील अडचणी दूर होण्यास मदत होते. कुंडलीत गुरु ग्रह कमकुवत असेल तर नशिबाची साथ मिळत नाही. तसेच विवाह तसेच यश मिळवण्यात अडचणी येतात. चला जाणून घेऊयात लाल किताब आणि ज्योतिषशास्त्रातील प्रभावी उपाय...
-मेहनत करूनही पदरी यश पडत नसेल तर बुधवार किंवा गुरुवारी गणपती बाप्पाला हळदीची माळ अर्पम करा. यामुळे यशाचा मार्ग मोकळा होतो. तसेच अडचणी दूर होतात.
-पैशांची चणचण भासत असल्यास शुक्रवारी भगवान विष्णु आणि देवी लक्ष्मीची पूजा करा. भगवान विष्णुंना हळद अर्पण करा. तसेच पुजेनंतर लाल कपड्यात हळदीची गाठ बांधून तिजोरीत ठेवावी. यामुळे धन आकर्षित होतं.
-शुभ कार्यासाठी जाण्यापूर्वी गणपती बाप्पांना हळदीचा टिळा लावा. त्यानंतर तुमच्या कपाळावरील हळदीचा टिका लावा. यामुळे कार्यात यश मिळतं.
बातमी वाचा- Hanuman Chalisa: हनुमान चालिसा पठणाचे नियम माहिती आहेत का? अशा पद्धतीने प्रार्थना केल्यास मिळते कृपा
-ज्या लोकांच्या कुंडलीत गुरु ग्रह कमकुवत आहे त्यांनी गुरुवारी चण्याची डाळ आणि हळदीचं दान करावा. तसेच गुरुवारी व्रत करून पिवळ्या पदार्थांचं सेवन करावं.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)