Tuesday Totke: मंगळवारी सूर्यास्तानंतर करा 2 लवंगांचा 'हा' चमत्कारिक उपाय, इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणार!

Tuesday Upay : प्रत्येकाला वाटतं की आपल्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा, संकटांपासून लांब राहण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात. ज्योतिषशास्त्रानुसारचे काही उपाय इथं देण्यात आलेत.

Updated: Jan 31, 2023, 07:22 PM IST
Tuesday Totke: मंगळवारी सूर्यास्तानंतर करा 2 लवंगांचा 'हा' चमत्कारिक उपाय, इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणार! title=
tuesday totke, hanuman

Tuesday Upay: प्रत्येकाला आयुष्यात संकटाचा सामना करावा लागतो. त्यामुळे अनेकांच्या आनंदावर पाणी फेरतं. अनेकजण संकटांपासून दूर राहण्यासाठी हनुमानजींच्या (Hanuman) आश्रयाला जाऊन संकटातून मुक्तीसाठी प्रार्थना करत असतात. मात्र, काहींच्या पदरी निराशा येते. अशातच ज्योतिषशास्त्रात (Astrology) काही खास उपाय सांगण्यात आले आहेत. ज्याचा वापर तुम्ही करून तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदी राहू शकता. (tuesday totke do these 2 clove upay after sunset god hanuman will fullfill your all wishes marathi astro news)

सूर्यास्तानंतर (Sunset) काही उपाय केल्यास व्यक्तीला जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या येत नाही. बाहुबली हनुमानाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी सूर्यास्तानंतर काही उपाय करावे लागतील. शास्त्रानुसार, हनुमानाची पुजा करण्याची योग्य वेळ ही सूर्यास्तानंतर आहे. सूर्यास्तानंतर केलेले उपाय हे फायदेशीर ठरतात, असं म्हटलं जातं.

कोणते उपाय कराल?

हनुमानाची पूजा (Worship of Hanuman) करताना उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून पूजा करावी. ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी (Tuesday) हनुमानाच्या बारा नावांचं स्मरण केलं तर तुम्हाला दु:खांपासून मुक्ती मिळते, असं मानलं जातं. सूर्यास्तानंतर 5 देशी तुपाच्या रोट्यांवर गुळ वगैरे ठेवून हनुमानाला अर्पण करावं. त्यावेळी हनुमानाला इच्छा व्यक्त करून दाखवल्यानंतर विशेष फायदा होतो. इच्छा व्यक्त केल्यानंतर तुम्ही गुळ तूप रोटी गरजू व्यक्तींना देऊ शकता.

मंगळवार मंगळ ग्रहाशी संबंधित आहे. त्याला बळकटी देण्यासाठी या दिवशी अनेक उपाय सुचवण्यात जातात. या दिवशी तुरटीचा उपाय केल्यानं माणसाला वाईट स्वप्नं येणं थांबतं. सूर्यास्तानंतर 108 लवंगाची माळ करून हनुमानाच्या चरणी अर्पण करा. त्याचठिकाणी बसून हनुमान चालिसाचं (Hanuman Chalisa) पाठण केल्याने फायदा होतो. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती (Financial status) देखील सुधारेल.

आणखी वाचा - Lucky Zodiac Sign : फेब्रुवारीत 'या' 4 भाग्यशाली राशींच्या लोकांचं नशीब चमकणार, होणार आर्थिक प्रगती

दरम्यान, वैवाहिक जीवनात प्रेम (Love in married life) टिकवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर, मंगळवारी हनुमानाच्या मंदिरात लाल ध्वज (Red flag) फटकणं गरजेचं आहे. त्याचा तुमच्या वैवाहिक जीवनात मोठा परिणाम दिसून येईल तसेच आर्थिक स्थिती देखील मजबूत होईल.

(Disclaimer:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)