Shani Nakshatra Gochar : शनीचं नक्षत्र गोचर ठरणार डोकेदुखी; 'या' राशींच्या आयुष्यात येणार कठीण काळ

Shani Nakshatra Gochar : ज्योतिष शास्त्रानुसार शतभिषा नक्षत्राचा स्वामी राहू आहे. अनेक राशीच्या लोकांना शनीच्या शतभिषा नक्षत्रात प्रवेश केल्याने भरपूर लाभ मिळू शकतात. पण काही राशी आहेत ज्यांना याची काळजी घेणं आवश्यक आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Aug 27, 2023, 05:40 AM IST
Shani Nakshatra Gochar : शनीचं नक्षत्र गोचर ठरणार डोकेदुखी; 'या' राशींच्या आयुष्यात येणार कठीण काळ title=

Shani Nakshatra Gochar : वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये शनी हा सर्वात महत्त्वाचा ग्रह मानला जातो. प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर रास बदलतात. यामध्ये शनी हा सर्वात हळू चालणारा ग्रह आहे. सध्या शनी स्वतःच्या राशीत कुंभ राशीत बसला आहे. दरम्यान शनी देव देखील काही काळानंतर नक्षत्र बदलतात. त्याचा प्रभाव प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर पडतो. 

ज्योतिष शास्त्रानुसार शतभिषा नक्षत्राचा स्वामी राहू आहे. अनेक राशीच्या लोकांना शनीच्या शतभिषा नक्षत्रात प्रवेश केल्याने भरपूर लाभ मिळू शकतात. पण काही राशी आहेत ज्यांना याची काळजी घेणं आवश्यक आहे. 15 ऑक्टोबरला पहाटे 4.49 वाजता शनी शतभिषा नक्षत्रात राहील. यानंतर ते धनिष्ठ नक्षत्रात प्रवेश करणार आहे. चला जाणून घेऊया शनीच्या नक्षत्र बदलामुळे कोणत्या राशीच्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

शनीच्या नक्षत्र परिवर्तनावेळी या राशीच्या व्यक्तींनी रहावं सावध

वृषभ रास

या राशीच्या लोकांच्या व्यवसायात काही चढ-उतार होऊ शकतात. त्याचप्रमाणे अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. करिअर आणि पैसा कमावण्याच्या क्षेत्रात प्रगतीच्या कमी संधी मिळू शकतात.  नोकरी करणाऱ्यांनी ऑफिसमध्ये थोडे सावध राहावं. या काळात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक टाळावी.

कन्या रास

कन्या राशीच्या राशीच्या लोकांना शतभिषा नक्षत्रात शनीच्या प्रवेशामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. या काळात तुम्हाला तुमच्या आरोग्याची खास काळजी घ्यावी लागणार आहे. नोकरी बदलण्याचा विचार काही प्रमाणात पुढे ढकणावा लागणार आहे. कामाच्या ठिकाणी कोणतरी तुम्हाला त्रास देणार आहे. 

वृश्चिक रास

या राशीच्या लोकांनी शनिच्या शतभिषा नक्षत्रात प्रवेश करण्याबाबत सावध राहावं लागणार आहे. नोकरी आणि व्यवसायात या काळात तुम्हाला नुकसान सहन करावं लागू शकतं. कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात. व्यवसायातही थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. तुमच्या आईची तब्येत बिघडू शकते. 

मीन रास

शनीच्या राशीतील बदलामुळे या राशीच्या लोकांच्या जीवनात अडचणी येऊ शकतात. नोकरीत काही समस्या निर्माण होऊ शकतात. कोणत्याही गोष्टीत विनाकारण वाद घालण्याचा प्रयत्न करू नका. व्यवसायात काही अडथळे येऊ शकतात. कोणताही निर्णय किंवा गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करा. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )