Todays Panchang : वर्षातील तिसऱ्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी काय आहेत शुभ मुहूर्त, पाहा आजचं पंचांग

Todays Panchang : आज महिन्याचा शेवट, नवं वर्ष सुरु होऊन त्या वर्षातील आणखी एक महिना जवळपास संपला. या अखेरच्या दिवसाचं नेमकं महत्त्वं काय? पाहून घ्या आजचं पंचांग   

Updated: Mar 31, 2023, 06:31 AM IST
Todays Panchang : वर्षातील तिसऱ्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी काय आहेत शुभ मुहूर्त, पाहा आजचं पंचांग  title=
todays panchang 31 march 2023 mahurat astro news

Todays Panchang : आज शुक्रवार. नोकरदार वर्गासाठी एका आठवड्याचा शेवट तर, सर्वसामान्यांसाठी एका महिन्याचा शेवटचा दिवस. 2023 या वर्षातील तिसरा महिनाही हा हा म्हणता निघून गेला. वर्षाच्या सुरुवातीपासूनच तुम्ही मनात काही शुभकार्य करण्याचं योजलं होतं. पण, काही कारणास्तव ते शक्य झालं नाही. एखादं शुभ कामही तुम्ही हातू घेऊ शकला नाहीत? हरकत नाही. आजचा दिवस आता कुठे सुरु झाला आहे. त्यामुळं तुमच्या मनात असणारं एखादं काम मार्गी लावण्यासाठी पंचांगात त्याला साजेशी वेळ असेल. चला तर मग पाहून घेऊया आजचं पंचांग. 

आजचा वार - शुक्रवार      

तिथी- दशमी 

नक्षत्र - पुष्य 

योग - सुकर्मा      

करण- तैतुल 

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 06:13 वाजता

सूर्यास्त - संध्याकाळी 06.38 वाजता

चंद्रोदय -  13:24

चंद्रास्त - 03:37

चंद्र रास- कर्क       

आजचे अशुभ काळ

दुष्टमुहूर्त– 08:42:07 पासुन 09:31:48 पर्यंत, 12:50:31 पासुन 13:40:12 पर्यंत

कुलिक– 08:42:07 पासुन 09:31:48 पर्यंत

कंटक– 13:40:12 पासुन 14:29:53 पर्यंत

राहु काळ– 10:52:32 पासुन 12:25:41 पर्यंत

कालवेला/अर्द्धयाम– 15:19:34 पासुन 16:09:15 पर्यंत

यमघण्ट–16:58:56 पासुन 17:48:37 पर्यंत

यमगण्ड– 15:31:59 पासुन 17:05:08 पर्यंत

गुलिक काळ–  07:46:14 पासुन 09:19:23 पर्यंत

शुभ काळ 

अभिजीत मुहूर्त - 12:00:51 पासुन 12:50:31 पर्यंत

हेसुद्धा वाचा : Horoscope 31 March 2023 : 'या' राशीच्या व्यक्तींनी अतिघाईत कोणताही निर्णय घेऊ नका!

 

चंद्रबलं आणि ताराबल 

ताराबल -  ज्येष्ठा, मूळ, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद, रेवती, अश्विनी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, माघ, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, विशाखा, अनुराधा

चंद्रबल - वृषभ, कर्क, कन्या, तुळ, मकर, कुंभ

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)