Horoscope Today | आज 'या' राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ दिवस; विद्यार्थ्यांसाठीही खुशखबर...

Horoscope Today : आज काही राशीच्या लोकांना कामात तणाव सहन करावं लागेल. आपल्या सहकाऱ्यांसोबत कामात आनंद मिळणार आहे. जाणून घ्या राशिफळ...

Updated: Jun 17, 2022, 08:27 AM IST
Horoscope Today | आज 'या' राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ दिवस; विद्यार्थ्यांसाठीही खुशखबर... title=

Horoscope Today 17 June 2022,  Daily Horoscope : शुक्रवारी तुळ राशीच्या लोकांसाठी काही आनंदातच्या बातम्या मिळणार आहेत. काही राशीच्या लोकांना कामात तणाव सहन करावं लागेल. आपल्या सहकाऱ्यांसोबत कामात आनंद मिळणार आहे. जाणून घ्या राशिफळ...

मेष : या राशीच्या लोकांना वरिष्ठांकडून चांगली बातमी मिळू शकते. नवीन प्रोजेक्ट सुरू करू शकता. विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस आनंददायी ठरू शकतो. नातेवाईकांची मदत करण्याची संधी आहे.

वृषभ : या राशीच्या लोकांना आज प्रवासाची संधी मिळू शकते. ऑफिसमध्ये प्रमोशन किंवा नवीन प्रोजेक्ट मिळू शकते. व्यापाऱ्यांना विदेश कंपन्यांकडून चांगली ऑफर मिळू शकते. नवीन गुंतवणूक फायद्याची ठरेल. विद्यार्थ्यांनी मन शांत ठेवणं गरजेचं आहे. घरात कलह टाळायला हवे.

मिथून : या राशीच्या लोकांचे आज कामात मन लागणार नाही. परंतू अनेक नवीन कल्पनांवर काम करण्याची संधी मिळेल. प्रियकर / प्रेयसी आपला वेळ आनंदात घालवू शकतील. गृहिणी आणि महिलांना काहीशा आरोग्याच्या समस्या जाणवतील.

कर्क :  कर्क राशीचे लोक आपल्या मधूर संवादामुळे वरिष्ठांचं मन जिंकतील. विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळेल. व्यापाऱ्यांना प्रवासाच योग आहे. मोबाईल, इलेक्ट्रिक वस्तूंपासून दूर रहा. अतिरिक्त काम टाळा. आज आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे.

सिंह : या राशीच्या लोकांसाठी आरोग्यच्या समस्या उद्भवतील. आपल्या पाल्यांकडून आनंदाची बातमी मिळेल. नातेवाईकांशी वाद होतील अशा प्रकरणांमध्ये पडू नका. विद्यार्थ्यांकडून कौतुकास्पद कामगिरीची बातमी येईल. गृहिणींसाठी उत्साहाचे वातावरण राहील.

कन्या : कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहाचा ठरेल. आठवड्यात अडलेली कामं मार्गी लागणार. वाद विवादापासून दूर रहा. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना नोकरीच्या ऑफर येतील. उद्योजकांसाठी आजचा दिवस थोडा निराशेचा ठरेल.

तुळ : तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आहे. अनेक कामं मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी मिळेल. उद्योजकांना नवीन सहकारी मिळतील. जिवनसाथीकडून सप्राईज मिळू शकते. आरोग्याची काळजी घेणं गरजेचं असेल. वृद्धांनी प्रवास टाळावा

वृश्चिक : वृश्चिक राशीच्या लोकांनी कोणतीही कामं पुढच्या आठवड्यासाठी पेंडिंग ठेवू नये. त्याने नुकसान होऊ शकते. याच आठवड्यात पूर्ण करा. आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. अध्यात्म कार्यात सहकार्य राहिल. व्यापाऱ्यांसाठी गुंतवणूक आणि नवीन प्रोजेक्टसाठी चांगला दिवस ठरेल. 

धनु : या राशीच्या लोकांना ऑफिसमध्ये अधिक मेहनत करण्याची गरज आहे. सहकाऱ्यांशी बोलताना संयम ठेवा. आज तुमचा आत्मविश्वास थोडा कमी असू शकतो. परंतू कामगिरी समाधानकारक राहील. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासात सातत्य कायम ठेवायला हवे. तरुणींना मोठ्या हुद्द्यावर कामाच्या संधी मिळू शकतील. नातेवाईकांशी सलोखा राखा.

मकर : या राशीच्या लोकांनी ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी सलोखा राखावा. महत्वपूर्ण विषयांवर चर्चेची संधी मिळेल. तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. व्यापाऱ्यांना धनलाभ होईल. उद्योजकांना फायद्याची ऑफर मिळेल. तरुणांनी अतिउत्साहीपणा टाळावा. जबाबदारीने कामं पूर्ण करणे आवश्यक ठरेल. आरोग्याच्या समस्या जाणवतील.

कुंभ : कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा ठरेल. जीवनसाथीकडून आनंदाची बातमी मिळेल. सह कुटूंब प्रवासाचा योग आहे. विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळालेले दिसेल. नोकरदारांना आर्थिक फायदा होईल.

मीन  : या राशीच्या लोकांसाठी आपल्या जवळच्या मित्राचा सल्ला महत्वाचा ठरेल. व्यापारात वृद्धी होईल. कामानिमित्त प्रवास होईल. तरुणांना काम पूर्ण करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागेल. कौटुंबिक वाद टाळा. आरोग्याच्या समस्या जाणवतील.