Happy New Year 2020 : नव्या वर्षी पहिल्या दिवसाचा 'या' राशीच्या मंडळींना होणार लाभ

तुमच्या काही समस्यांवर तोडगा निघेल.... 

Updated: Jan 1, 2020, 07:18 AM IST
Happy New Year 2020 : नव्या वर्षी पहिल्या दिवसाचा 'या' राशीच्या मंडळींना होणार लाभ  title=
नववर्ष आणि राशीभविष्य....

मेष- करिअरसाठी आजचा नववर्षाचा पहिला दिवस चांगला आहे. स्पष्ट बोलण्याने अनेक समस्यांपासून मुक्त व्हाल. धनलाभ होऊ शकतो. केलेल्या कामांचा फायदा मिळेल. मित्र आणि नातेवाईकांची मदत मिळू शकते. सर्वांचा सन्मान करा. 

वृषभ- मनात काही नवीन विचार येऊ शकतात. विश्वासू लोकांची योग्य वेळेत मदत मिळेल. कामानिमित्त प्रवासयोग आहे होऊ शकतो. शांत राहाल तर स्वत:साठी चांगलं काम करु शकाल.

मिथुन- समस्यांमधून सुटका होईल. नवीन उपकरण खरेदी करण्याची इच्छा होईल. आजचा दिवस अनेक अंशी तुम्हाला लाभ होणार आहे. नवीन काम हाती घेऊ शकता. प्रेमसंबंधांमध्ये यश मिळेल.

कर्क- गोंधळाच्या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करा , यश मिळणार आहे.  प्रयत्न करत राहा. समस्या सोडवू शकाल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. चांगली बातमी मिळू शकते. 

सिंह- आज अधिक मेहनत घेतली तर यशाला गवसणी घालाल, विचाराधीन कामं पूर्ण होतील. येणाऱ्या पुढील दिवसांसाठी योजना आखा त्या अनुशंगाने काम करा. खास व्यक्तीशी तुमच्या मनातील गोष्ट शेअर कराल.

कन्या- तुमचं व्यक्तित्व आकर्षक राहील. मन प्रसन्न राहील. बऱ्याच महत्त्वाच्या व्यवहारांवर विचार कराल. नोकरीच्या ठिकाणी दिवस उत्साही असेल. मनातील शंका दूर होतील. 

तुळ- अविवाहितांसाठी दिवस चांगला आहे. वैवाहिकांना जोडीदाराची मदत मिळेल. जोडीदारासोबत संबंध सुखकारक असतील. चिंता करण्याची गरज नाही. चांगली बातमी मिळेल. नोकरीत नवीन काम मिळण्याची चिन्हं आहेत. अर्थार्जनाच्या नव्या वाटा गवसतील. 

वृश्चिक- धनलाभ होऊ शकते. आर्थिक परिस्थिती सुधारेल. गुंतवणूक करताना तुमच्या मताप्रमाणेच करा. आत्मविश्वास वाढेल. नोकरीच्या ठिकाणी वातावरण चांगले राहील. 

धनु- मोठ्यांशी चर्चा होण्याची शक्यता आहे. एखाद्याला मदत करण्याची संधी मिळेल. व्यवसायात यश मिळेल. वरिष्ठांकडून कामाचं कौतुक होणार आहे. 

मकर- मनातील गोष्ट खास व्यक्तीशी शेअर करा. ही भावना सुखावणारी असेल. मनाचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा. जबाबदारी वाढेल.  वैवाहिक जीवन सुखी राहील.

कुंभ- मेहनत कमी आणि अधिक फायदा होणार आहे. तरीही मेहनत करणं सोडू नका. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीसोबत महत्त्वपूर्ण गोष्टींवर चर्चा होऊ शकते. याचा करियरसाठी फायदा होईल. दिवस आनंददायी असेल. .

मीन-  नोकरीच्या ठिकाणी आणि घरीसुद्धा वातावरणात वेगळीच लहर असेल. हा आनंद टिकवून ठेवण्याची जबाबदारी तुमची आहे. कुटुंबीयांसोबत जास्त वेळ व्यतीत कराल. यश तुमच्या प्रतिक्षेत आहे, त्या दिशेने वाटचाल करणं सुरु ठेवा.