माता लक्ष्मीचे रूप असतात या महिला ज्यांच्या अंगावर असतात अशा खुणा

सामुद्रिक शास्त्रामध्ये अवयवांची रचना, चिन्हे आणि तीळ यावरून व्यक्तीबद्दल बरीच माहिती मिळते.

Updated: Jun 2, 2022, 10:18 PM IST
माता लक्ष्मीचे रूप असतात या महिला ज्यांच्या अंगावर असतात अशा खुणा title=

मुंबई : शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व, इच्छा, आवडी-निवडी वेगवेगळ्या असतात. ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीच्या विविध गोष्टी राशीच्या आधारे ओळखल्या जातात. तर समुद्रशास्त्रानुसार, व्यक्तीच्या शरीराच्या अवयवांच्या रचनेच्या आधारे, स्वभाव आणि इच्छा इत्यादी देखील ओळखल्या जातात. म्हणजेच तुमच्या शरीरावर असलेले चिन्ह किंवा तीळ हे तुमच्या स्वभावाबद्दल खूप काही बोलतात.

सामुद्रिक शास्त्रामध्ये अवयवांची रचना, चिन्हे आणि तीळ यावरून व्यक्तीबद्दल बरीच माहिती मिळते. शरीरावर तयार झालेली काही चिन्हे आणि तीळ अशुभ मानली जातात, तर काही चिन्हे शुभ मानली जातात.

त्याच वेळी, काही चिन्हे सूचित करतात की, ती व्यक्ती भाग्यवान आहे. त्याचप्रमाणे, आज आपण अशा महिलांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांच्या शरीरावर बनलेल्या खुणा आणि चिन्हे त्यांच्या भाग्याची ओळख आहेत.

ही खूण महिलांच्या पायाच्या तळव्यावर असते

ज्या स्त्रियांच्या पायांच्या तळव्यावर कमळ, शंख किंवा चक्र चिन्ह असते, त्या महिला खूप भाग्यवान असतात. असे समुद्र शास्त्राचे मत आहे. तसेच, रुंद, गोलाकार अंगठे असलेल्या महिला देखील भाग्यवान मानल्या जातात. त्यामुळे जिकडे तिकडे पैसा आणि संपत्तीचा पाऊस पडतो.

लांब बोटांच्या महिला

असे मानले जाते की, लांब बोटांच्या स्त्रिया देखील भाग्यवान असतात. अशा पद्धतींच्या बोटांच्या आकाराच्या महिलांचे पती नोकरी आणि व्यवसायात खूप प्रगती करतात. लग्नानंतर या महिला आपल्या पतीसाठी भाग्यवान ठरतात आणि त्यांच्या यशाचे कारण बनतात.

लांब मान असलेल्या महिला

ज्या महिलांची मान लांब असते, त्यांना समाजात खूप मान मिळतो. त्यांना केवळ माहेरच्या घरातच नाही, तर सासरच्या घरातही खूप मान मिळतो. तसेच ज्या महिलांच्या पायाचे बोट रुंद, गोलाकार आणि लाल असते त्यांना खूप भाग्यवान मानले जाते.

कपाळावर त्रिशूल

त्याचबरोबर समुद्रशास्त्रानुसार ज्या महिलांच्या कपाळावर त्रिशूल चिन्ह असते त्यांना भाग्यवान मानले जाते. या महिला कुटुंब पैसे आणि अन्नाचा पाऊस पाडतात.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)