Mangal-Ketu Yuti : तूळ राशीमध्ये होणार मंगळ-केतूची युती; 'या' राशींना मिळणार अपार पैसा, पद-प्रतिष्ठा

Mangal And Ketu Conjunction In Tula: 3 ऑक्टोबर रोजी मंगळ आणि केतू यांची युती होणार आहे. मंगळ 3 ऑक्टोबरला तूळ राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत या संयोगाचा प्रभाव काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Sep 21, 2023, 08:49 PM IST
Mangal-Ketu Yuti : तूळ राशीमध्ये होणार मंगळ-केतूची युती; 'या' राशींना मिळणार अपार पैसा, पद-प्रतिष्ठा title=

Mangal And Ketu Conjunction In Tula: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या ठरलेल्या वेळेनुसार गोचर करतात. यावेळी हे ग्रह इतर ग्रहांशी संयोग बनवतात. दरम्यान या युतीचा सर्व राशींच्या जीवनावर परिणाम होतो. येत्या काळात तूळ राशीमध्ये मंगळ आणि केतूचा संयोग तयार होणार आहे. 

3 ऑक्टोबर रोजी मंगळ आणि केतू यांची युती होणार आहे. मंगळ 3 ऑक्टोबरला तूळ राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत या संयोगाचा प्रभाव काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे. जाणून घेऊया यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना या युतीचा फायदा होणार आहे.

कन्या रास (Kanya Zodiac)

मंगळ आणि केतूचा संयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. यावेळी तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. कुटुंबात सुरू असलेला तणाव दूर होणार आहे. यावेळी पैसे गुंतवणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. भविष्यात तुम्हाला फायदा होईल. यावेळी तुम्हाला अडकलेले पैसे मिळतील. नोकरी बदलण्यासाठी उत्तम काळ आहे. नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकता. 

सिंह रास (Leo Zodiac)

सिंह राशीच्या लोकांसाठी मंगळ आणि केतूची युती अनुकूल ठरणार आहे. हा संयोग तुमच्या राशीतून तिसऱ्या घरात तयार होणार आहे. ज्यांचा व्यवसाय परदेशाशी संबंधित आहे, अशा लोकांना चांगला लाभ मिळू शकतो. तुम्हाला अपघाती पैसे मिळू शकतात. तुमची बोलण्याची पद्धत सुधारणार आहे. करिअरमध्ये उत्तम संधी मिळतील. वैवाहिक जीवनासाठी हा काळ शुभ आहे. 

मकर रास (Makar Zodiac)

मंगळ आणि केतूचा संयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. जर नोकरदार लोक नोकरी बदलण्याचा विचार करत असतील तर ही खूप चांगली संधी आहे. तुमच्या वडिलांसोबत तुमचं नातं मजबूत होणार आहे. कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध सुधारतील. या काळात तुम्ही कोणतीही मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकता. तुमचे मन धार्मिक कार्यात व्यस्त राहणार आहे.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )