Rahu Ketu Shani Gochar: चंद्रग्रहणानंतर राहू-केतू आणि शनीच्या चालीमध्ये होणार बदल, या 3 राशींवर बरसणार पैसा

Rahu Ketu Shani Gochar: 30 ऑक्टोबरला राहू आणि केतू हे मायावी ग्रहांचं गोचर होणार आहे. राहू मीन राशीत आणि केतू तूळ राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी 4 दिवसांनंतर शनिदेव कुंभ राशीत मार्गी होणार आहेत. ज्यामुळे 3 राशीच्या लोकांचे नशीब उजळू शकतं.

सुरभि जगदीश | Updated: Sep 22, 2023, 08:15 AM IST
Rahu Ketu Shani Gochar: चंद्रग्रहणानंतर राहू-केतू आणि शनीच्या चालीमध्ये होणार बदल, या 3 राशींवर बरसणार पैसा title=

Rahu Ketu Shani Gochar: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ऑक्टोबर महिन्यात चंद्र ग्रहण लागणार आहे. 29 ऑक्टोबर रोजी हे चंद्र ग्रहण होणार आहे. दरम्यान दुसऱ्या दिवशी 30 ऑक्टोबरला राहू आणि केतू हे मायावी ग्रहांचं गोचर होणार आहे. राहू मीन राशीत आणि केतू तूळ राशीत प्रवेश करणार आहे. 

यावेळी 4 दिवसांनंतर शनिदेव कुंभ राशीत मार्गी होणार आहेत. ज्यामुळे 3 राशीच्या लोकांचे नशीब उजळू शकतं. जाणून घेऊया राहू, केतू आणि शनी यांच्या गोचरमुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना सकारात्मक फायदा होणार आहे.

कर्क रास (Cancer Zodiac)

3 ग्रहांचे बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकणार आहे. यावेळी तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. तुम्हाला भागीदारीच्या कामात लाभ मिळू शकणार आहे. तुमची कोणतीही योजना यशस्वी होऊ शकते. या काळात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. एखाद्याच्या भागीदारीत केलेली गुंतवणूक आणि व्यवसाय शुभ परिणाम देणार आहे.

मिथुन रास (Mithun Zodiac)

तीन ग्रहांचं राशी परिवर्तन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. तुम्हाला गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो. उत्पन्नात वाढ होऊ शकते आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. व्यावसायिकांना यावेळी चांगला नफा होऊ शकतो. तुमच्या जोडीदाराकडूनही सहकार्य मिळेल. आपण काम किंवा व्यवसायासाठी प्रवास करू शकता, जे शुभ सिद्ध होईल. या काळात कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेला बसणार आहेत त्यांना पूर्ण यश मिळेल. 

सिंह रास (Leo Zodiac)

तीन ग्रहांचं गोचर तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहे. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकणार आहे. या काळात नशीब तुमच्या बाजूने असणार आहे. तुमचे धैर्य आणि पराक्रम वाढणार आहे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळू शकतात. मेहनतीच्या जोरावर तुम्ही प्रत्येक प्रकारे प्रशंसा मिळवाल. जे लोक व्यावसायिक आहेत त्यांना यावेळी अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )