उत्तर की दक्षिण कोणत्या दिशेला डोके ठेवून झोपावे; वास्तूशास्त्र काय सांगतं?

Best Direction For Sleep: उत्तम आरोग्यासाठी डोके कोणत्या दिशेला ठेवून झोपावे याचे मार्गदर्शन वास्तुशास्त्रात केले आहे. जाणून घेऊया. 

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 6, 2023, 04:37 PM IST
उत्तर की दक्षिण कोणत्या दिशेला डोके ठेवून झोपावे; वास्तूशास्त्र काय सांगतं? title=
The Best Sleeping Direction as Per Vastu in marathi

Best Direction For Sleep In Marathi: वास्तु शास्त्रानुसार प्रत्येक दिशेचे वेगळे महत्त्व सांगितले गेले आहे. इतंकच, नव्हे तर प्रत्येत दिशात वेगळीच उर्जा असते. त्यामुळं कोणतंही काम करण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार त्या दिशेचे महत्त्व ठरवलं जातं. वास्तुशास्त्रात कोणत्या दिशेला झोपावे, हेदेखील सांगितलं गेलं आहे. झोपण्यासाठी कोणती दिशा योग्य व अयोग्य आहे व त्याची कारणे हे देखील शास्त्रात सांगण्यात आलं आहे. योग्य दिशेनुसार झोपल्याने झोप चांगली लागते तसेच, आरोग्यावरही काही चुकीचा परिणाम होत नाही. तर, शास्त्रानुसार चुकीच्या दिशेने झोपल्यास मानसिक तणाव, थकवा आणि नकारात्मक गोष्टीचा प्रभाव पडतो. त्यामुळं कोणत्या दिशेने डोके करुन झोपावे व त्याचा आपल्यावर काय परिणाम होतो, हे जाणून घ्यावे. 

दक्षिण दिशाः वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला डोके ठेवून झोपणे जास्त शुभ असते. चांगली झोप येण्यासाठी या दिशेला डोके करुन झोपणे चांगले मानले जाते. दक्षिण दिशेला डोके करुन झोपल्याने आयुष्यात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य, सौभाग्य, यश आणि धनाची प्राप्ती होते. इतंकच नव्हे तर दिवसेंदिवस त्याची प्रगतीदेखील होत जाते. त्याची निर्णय क्षमतादेखील चांगली राहते. विचार सकारात्मक होतात. नवरा-बायकोसाठीही या दिशेला डोके करुन झोपणे चांगले असते. 

पूर्व दिशाः पूर्व दिशेला डोके ठेवून झोपल्याने त्या व्यक्तीची स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. करिअरमध्ये चांगली संधी चालून येते. चांगली झोप मिळते. त्या व्यक्तीचा अध्यात्मिकतेकडे कल वाढतो. अभ्यासातही त्याचे मन लागते.

पश्चिम दिशाः जे व्यक्ती सतत तणावात राहतात किंवा त्यांना सतत भीती जाणवत पाहते त्यांनी पश्चिम दिशेला डोके ठेवून झोपावे. असं केल्याने मन स्थिर व शांत राहते. 

उत्तर दिशाः वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेला कधीही डोके ठेवून झोपे नये. वास्तुनुसार झोपण्यासाठी उत्तर दिशा अशुभ मानली जाते. उत्तर दिशेला डोके ठेवून झोपल्याने नकारात्मक उर्जा मिळते. तर, त्या व्यक्तीला अनेक आजारांचा त्रास जाणवतो. गाढ झोप येत नाही. सतत जाग येत राहते. अशामुळं आयुर्मान कमी होते, अशी मान्यता आहे. उत्तर दिशेला फक्त मृतदेहाचे डोके ठेवले जाते, असं बोललं जातं. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.