Surya Shani Gochar 2023 : येत्या जून महिन्यात सूर्य आणि शनि एकाच वेळी भ्रमण करणार आहेत. 15 जून रोजी रात्री 11.58 वाजता सूर्य मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. त्याचसोबत 17 जून रोजी शनी त्याच्या मूळ राशी कुंभ राशीत वक्री चाल चालणार आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, जून हा महिना अनेक राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे.
ज्योतिषशास्त्रामध्ये, पिता-पुत्र सूर्य आणि शनि यांचं एकाचवेळी वक्री चाल चालणार असून ही चाल फार महत्त्वाची मानली जाते. या बदलामुळे 4 राशींना विशेष लाभ मिळणार आहेत. कोणत्या अशा राशी आहेत त्या सूर्य-शनी गोचरमुळे फायदा होणार आहे, ते पाहुयात.
सूर्याचा संचार हा मिथुन राशीतच असणार आहे. या काळामध्ये तु्ही एखादं नवीन काम सुरु करू शकता. शिवाय यावेळी तुम्हाला करत असलेल्या कामाचे चांगले परिणाम दिसून येणार आहेत. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होणार असून तुमचा पगार वाढण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांसाठी पद आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत तुम्ही बाहेर फिरायला जाण्याचाही विचार करू शकता.
सूर्य आणि शनीचं गोचर या राशीच्या व्यक्तींसाठी फार लाभदायक ठरणार आहे. तुमच्या घरी मोठं शुभकार्य होणार आहे, यावेळी खर्च होऊ शकतो. मात्र योग्य नियोजन केल्यास त्रास होणार नाही. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचं तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळणार आहे. यावेळी सर्व प्रकारचे त्रास आणि समस्या दूर होऊ शकणार आहेत. मानसिकदृष्ट्या आनंद तसंच शांती मिळू शकणार आहे.
या राशीच्या व्यक्तींसाठी सूर्य आणि शनीचे गोचर करिअर आणि व्यवसायात प्रगती देणारं ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी सर्व गोष्टी मनाजोग्या होत असल्या कारणाने तुम्हाला आनंद होणार आहे. नातेवाईकांशी भेट होण्याची शक्यता आहे. कामात व्यस्त राहू शकता. यापूर्वी जी कामं बिघडलेली असतील ती नीट आणि पूर्ण होऊ शकतील.
मकर राशीच्या व्यक्तींना सूर्य आणि शनीच्या गोचरमुळे अनपेक्षित यश मिळू शकतं. या काळामध्ये तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळी भेट देऊ शकता. नोकरीत पदोन्नती मिळू शकते शिवाय आर्थिक स्थितीही मजबूत होणार आहे. सरकारी नोकरीसाठी परीक्षा देणाऱ्यांना अपेक्षित यश मिळणार आहे. व्यवसायाशी संबंधित नवीन काम हाती घेऊ शकता.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)