Surya and Shani made Samsaptak Yoga: ज्योतिषशास्त्रानुसार ठराविक कालावधीनंतर ग्रह राशी बदल करत असतात. या बदलामुळे काही योग तयार होतात. काही शुभ, तर काही योग अशुभ असतात. जुलै महिन्यात शनि आणि सूर्य या दोन्ही महत्त्वाच्या ग्रहांनी आपली रास बदलली आहे. शनि संक्रमण आणि सूर्य संक्रमण अवघ्या पाच दिवसात झाले. ज्योतिषशास्त्रात हे दोन्ही ग्रह खूप महत्त्वाचे मानले जातात. या ग्रहांच्या स्थितीत थोडासा बदल देखील मोठा प्रभाव पाडतो. शनि ग्रहाने मकर राशीत प्रवेश केला आहे आणि सूर्य आता कर्क राशीत आहे. या स्थितीमुळे समसप्तक योग तयार होत आहे. वास्तविक आता दोन्ही ग्रह एकमेकांच्या सातव्या भावात बसले आहेत. यापासून बनवलेले समसप्तक चार राशीच्या लोकांसाठी खूप शुभ सिद्ध होईल.
समसप्तक योग 4 राशींसाठी फलदायी
मिथुन- मिथुन राशीच्या लोकांसाठी समसप्तक योग खूप चांगला राहील. या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ मिळेल. पगार वाढण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांचा नफा वाढेल. गुंतवणूक करणाऱ्यांनाही फायदा होईल. बचत करण्यासाठी ही चांगली वेळ आहे.
कर्क - समसप्तक योग कर्क राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरेल. विशेषत: सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला राहील. त्याचबरोबर नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना त्यांच्या आवडीची नोकरी मिळू शकते.
तूळ- या राशीच्या लोकांना नवीन नोकरी मिळेल. कामात यश आणि सन्मान मिळेल. उत्पन्न वाढेल. करिअरसाठी हा काळ खूप चांगला आहे. व्यावसायिकांनाही खूप फायदा होईल.
मीन - मीन राशीच्या लोकांसाठी शनि आणि सूर्याच्या स्थितीमुळे तयार झालेला समसप्तक योग फलदायी ठरेल. या राशीच्या लोकांना करिअरमध्ये यश मिळेल. फ्रेशर्सना नोकऱ्या मिळतील. काही चांगली बातमीही मिळू शकते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)