सूर्य, शनी आणि राहूची बनतेय घातक दृष्टी; 'या' राशींच्या आयुष्यात होणार मोठी उलथा-पालथ

Astrology : बदलाचा मानवी जीवनावर परिणाम दिसून येतो. सूर्य, शनि आणि राहू यांची मिळून एक घातक दृष्टी तयार होत आहे. त्याचप्रमाणे मेष राशीत राहू आणि गुरूच्या संयोगामुळे गुरु चांडाळ दोष तयार होतोय. 

सुरभि जगदीश | Updated: Aug 31, 2023, 06:00 AM IST
सूर्य, शनी आणि राहूची बनतेय घातक दृष्टी; 'या' राशींच्या आयुष्यात होणार मोठी उलथा-पालथ title=

Astrology : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. या बदलाचा मानवी जीवनावर परिणाम दिसून येतो. सूर्य, शनि आणि राहू यांची मिळून एक घातक दृष्टी तयार होत आहे. त्याचप्रमाणे मेष राशीत राहू आणि गुरूच्या संयोगामुळे गुरु चांडाळ दोष तयार होतोय. 

याचसोबत समसप्तक योगही तयार होताना दिसतोय. दरम्यान या दोन्हीमुळे 4 राशीच्या लोकांसाठी नकारात्मक परिणाम दिसून येणार आहेत. काहींच्या घरामध्ये कुटुंब कलह होणार आहेत, तर काहींना पैशांच्या बाबतीत धनहानी होणार आहे. जाणून घेऊया या 4 राशी कोणत्या आहेत.

वृषभ रास (Taurus Zodiac)

शनि, राहू आणि सूर्याचे अशुभ पैलू तुमच्यासाठी हानिकारक सिद्ध होऊ शकतात. तुमच्या गोचर कुंडलीच्या 12 व्या घरात गुरु आणि राहूचा चांडाल योग तयार होतोय. या काळात उगाचचा खर्च खूप होऊ शकणार आहेत. या काळात पैशाची हानी होऊ शकते. घर आणि कुटुंबात समस्या राहतील. 30 ऑक्टोबरपर्यंत कोणतेही नवीन काम हाती घेऊ नये. करिअरमध्ये चढ-उतारांचा सामना करावा लागतो. 

कर्क रास (Cancer Zodiac)

शनि, राहू आणि सूर्याची अशुभ दृष्टी कर्क राशीच्या लोकांसाठी धोकादायक ठरणार आहे. या काळात करिअरमध्ये चढ-उतार असतील. आजारपणावरही पैसा खर्च होण्याची दाट शक्यता आहे. कोणत्याही ठिकाणी पैसे गुंतवू नका. कामाच्या ठिकाणी इतरांशी तुमचे वाद होणार आहेत.

कन्या रास (Kanya Zodiac)

शनि, राहू आणि सूर्याचे अशुभ पैलू तुमच्यासाठी हानिकारक सिद्ध होऊ शकते. या काळात तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. पैसे गुंतवू नका. यावेळी आपल्या खाण्याच्या सवयींची काळजी घ्या. काम आणि व्यवसायात मोठे बदल सध्या टाळा. अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. तुमच्यात अहंकार निर्माण होऊ शकतो. 

वृश्चिक रास (Scorpio Zodiac)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शनि, राहू आणि सूर्याचे घातक पैलू हानिकारक सिद्ध होऊ शकतात. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात चढ-उतारांना सामोरं जावं लागू शकतं. यावेळी कोणालाही कर्ज देऊ नका. वैयक्तिक आयुष्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. गुंतवणुकीतून नुकसान होण्याची शक्यता आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या बोलण्यात अडकू नका.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )