Surya Guru Yuti : 2024 मध्ये सूर्य व गुरुची युती 'या' राशींच्या लोकांसाठी अच्छे दिन, पदोन्नतीसह पैशांची बरसात

Surya Guru Yuti :  येणारं नवीन वर्ष हे ग्रह गोचरच्या दृष्टिकोनातून भाग्यशाली आहे. नवीन वर्षात सूर्य आण गुरुचा संयोग होणार आहे. त्यामुळे काही राशींसाठी तो वरदान ठरणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: Dec 4, 2023, 02:00 PM IST
Surya Guru Yuti : 2024 मध्ये सूर्य व गुरुची युती 'या' राशींच्या लोकांसाठी अच्छे दिन, पदोन्नतीसह पैशांची बरसात  title=
Surya Guru Yuti Union of Sun and Guru in 2024 will bring good days promotion and rain of money for people of these zodiac signs

Surya Guru Yuti : वैदिक ज्योतिषशास्त्रात सूर्याला ग्रहांचा राजा मानला जातो. तर सूर्य हा आत्म्याचा कारकही आहे. सूर्य हा मानवाला ऊर्जा आणि शक्ती प्रदान करतो. त्यामुळे सूर्य ग्रहाच्या स्थिती बदलाचा परिणाम हा मानवी जीवनावर होतो. तर गुरु हा ग्रहांचा गुरु मानला जातो. तो सुख, समृद्धी, संपत्ती, वैभव आणि सन्मानचा कारक आहे. अशा स्थिती जेव्हा सूर्य आणि गुरुचा संयोग होतो तेव्हा मानवी जीवनात सुख समृद्धी आनंद आणि ऊर्जेचा प्रवाह वाढतो. सूर्य आणि गुरु हा संयोग नवीन वर्षात 2024 मध्ये आपल्याला पाहिला मिळणार आहे. त्यामुळे हा संयोग काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. (Surya Guru Yuti Union of Sun and Guru in 2024 will bring good days promotion and rain of money for people of these zodiac signs) 

ग्रहांचा राजा सूर्य हा 13 एप्रिल 2024 ला रात्री 9.15 वाजता मेष राशीत गोचर करणार आहे. मेष राशीत गुरु ग्रहांचं गोचर हे या महिन्याच्या अखेरीस 31 डिसेंबर 2023 ला झालं असणार आहे. अशा स्थितीत मेष राशीत सूर्य आणि गुरुचं मिलन होणार आहे. हा मिलाप 1 मे 2024 ला दुपारी 2.29 पर्यं असणार आहे. त्यानंतर गुरुदेव वृषभ राशीत गोचर करणार आहे. या संयोग कुठल्या राशींसाठी वरदान ठरणार आहेत पाहूयात.

'या' राशींसाठी ठरणार वरदान 

मेष रास (Aries Zodiac) 

सूर्य आणि गुरुदेवाचं मिलन या राशीच्या चढत्या घरात होणार आहे. त्यामुळे येणारं नवीन वर्ष हे या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. तुमच्या आयुष्यातील समस्या आता संपुष्टात येणार आहे. सरकारी क्षेत्राशी निगडित लोकांना या संयोगाचा जबरदस्त फायदा होणार आहे. सूर्य करिअर आणि व्यवसायाचा स्वामी असल्याने या लोकांना त्याचा अफाट फायदा आणि यश प्राप्त होणार आहे. तुमच्या कामावर वरिष्ठ अधिकारी प्रसन्न असणार आहे. तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. तुमच्यावरील कर्जाचं बोझ उतरणार आहे. वडिलोपार्जित व्यवसायातून तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे. 

मिथुन रास (Gemini Zodiac)

या राशीत गुरु आणि सूर्य यांच्या संयोग अकराव्या घरात होणार आहे. कुंडलीतील हे घर उत्पन्न, आर्थिक लाभ, संपत्ती आणि कीर्तीचं मानलं जातं. त्यामुळे या लोकांना अचानक धनलाभ होणार आहे. यांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. बचत करण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात. उत्पन्नाचे नवं स्त्रोत तुम्हाला सापडणार आहे. नोकरीत बढती आणि पगार वाढ हे नवीन वर्ष घेऊन येणार आहे. कुटुंबासोबत आनंदी क्षण व्यतित करणार आहात. थोड्या खर्चात वाढ होईल पण तुम्ही आनंदी असणार आहात. समाजात मान सन्मान वाढणार असून नाव आणि कीर्ती वाढणार आहे. 

हेसुद्धा वाचा - Kuldeepak Rajyoga : 500 वर्षांनंतर कुंडलीत 'कुलदीपक राजयोग'! 2024 मध्ये 'या' राशींना मिळणार पैसा, प्रतिष्ठा

कर्क रास (Cancer Zodiac)   

या राशीमध्ये सूर्य आणि गुरुचा संयोग हा दहाव्या घरात होतो आहे. या घराला करिअर आणि कर्माचं घर मानलं जातं. या राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष 2024 हे प्रतिष्ठा, सन्मान घेऊन आलं आहे. तुमच्या आयुष्यात आता आनंदच आनंद असणार आहे. व्यावसायिकांसाठी हा मोठा फायदेशीर संयोग असणार आहे. नोकरदार लोकांनाही कार्यक्षेत्रात अनेक फायदे होणार आहेत. वैयक्तिक जीवनात कुटुंबात आनंद आणि समृद्धी नांदणार आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)