Surya Grahan 2022 : चुकूनही आज करु नका ‘हे’ महापाप; जेवणाशी आहे असा संबंध

Surya grahan दरम्यान काही लहानसहान चुका टाळण्याचं आवाहनही करण्यात येत आहे. यातील एक चूक ही थेट जेवणाशी आणि घरात असणाऱ्या तुळशीशी संबंधित आहे. हिंदू धर्मात तुळशीला अनन्यसाधारण महत्त्वं आहे, तिला मातेचं स्वरुप प्राप्त आहे. प्रत्येक शुभकार्यात तुळशीपत्रांचा वापर केला जातो. देवाला नैवेद्य दाखवतानाही त्यावर एक तुळशीपत्र ठेवलं जातं.

Updated: Oct 25, 2022, 08:35 AM IST
Surya Grahan 2022 : चुकूनही आज करु नका ‘हे’ महापाप; जेवणाशी आहे असा संबंध  title=
surya grahan 2022 Dont pluck tulsi basil leaves

Solar Eclips 2022 : ऐन दिवाळीच्या दिवसांमध्ये सूर्य ग्रहण असल्यामुळे अनेक गोष्टी बदलल्या आहेत. अगदी गर्भवती महिलांपासून लहान मुलांपर्यंत अनेकजण या ग्रहण काळात काळजी घेताना दिसणार आहेत. यातच काही लहानसहान चुका टाळण्याचं आवाहनही करण्यात येत आहे. यातील एक चूक ही थेट जेवणाशी आणि घरात असणाऱ्या तुळशीशी संबंधित आहे. हिंदू धर्मात तुळशीला अनन्यसाधारण महत्त्वं आहे, तिला मातेचं स्वरुप प्राप्त आहे. प्रत्येक शुभकार्यात तुळशीपत्रांचा वापर केला जातो. देवाला नैवेद्य दाखवतानाही त्यावर एक तुळशीपत्र ठेवलं जातं. (surya grahan 2022 Dont pluck tulsi basil leaves)

आज, सूर्यग्रहणाच्या (Solar Eclips) दिवशीसुद्धा सूतक काळ सुरु होण्यापूर्वी तुळशीची पानं अन्नपदार्थांमध्ये टाकली जातात. पण, तुम्हाला माहितीये का आज मात्र ही पानं तोडणं वर्ज्य आहे. असं केल्यास तुम्ही एका महापापाचे धनी व्हाल.

तुळशीची पानं तोडण्याने महापाप? ते कसं?

शास्त्रांमध्ये नमूद केल्यानुसार सूतक काळाच्या आधी तुळशीपत्र तोडून ती जेवणात टाकली जातात. पण, आता मात्र सूतक काळ सुरु होऊनही काही तास उलटले आहेत. पहाटे 4 वाजून 22 मिनिटांनी सूतक काळ सुरु झाला आहे. त्यामुळं या काळात तुळशीपत्र तोडल्यास तुमच्या माथी महापाप येऊ शकतं.

अधिक वाचा : Surya Grahan 2022 : सूर्यग्रहणामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, कसा ते जाणून घ्या

अन्नपदार्थांमध्ये का घालतात तुळशीपत्र?

अन्नपदार्थांमध्ये तुळशीपत्र टाकण्यामागे धार्मिक कारणांसोबतच काही शास्त्रीय कारणंही आहेत. असं म्हटलं जातं की ग्रहण काळात वातावरणात असणारी किरणं नकारात्मक प्रभास मागे सोडतात. यादरम्यान तुम्ही अन्नपदार्थ खुले ठेवले तर त्यावाटे नकारात्मक परिणाम तुमच्या शरीरात प्रवेश करु शकतो. (why do we put tulsi leaf in food?)

तुळशीपत्रामध्ये पारा असतो. ज्यावर कोणत्याही किरणांचा प्रभाव पडत नाही. असं म्हणतात की ग्रहणादरम्यान येणारी किरणं आणि नकारात्मक उर्जा तुळशीमुळे निष्क्रीय होते. ज्यामुळं तुमच्यावरही ते सावट राहत नाही.

 

(वरील माहिती सर्वसामान्य धारणांच्या आधारे घेण्यात आली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)