Surya Grahan 2022: सूर्यग्रहण पाहताना काय काळजी घ्याल

यंदाच्या वर्षातील दुसरं आणि  शेवटचं सूर्यग्रहण घ्या अशी काळजी...   

Updated: Oct 25, 2022, 07:51 AM IST
Surya Grahan 2022:  सूर्यग्रहण पाहताना काय काळजी घ्याल title=

Surya Grahan 2022: ज्योतिषशास्त्रानुसार यंदाच्या वर्षातील दुसरं आणि  शेवटचं सूर्यग्रहण दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 25 ऑक्टोबर रोजी दिसणार आहे. वर्षांच्या शेवटचं सूर्यग्रहण आज संध्याकाळपासून सुरू होणार आहे. पण सूर्यग्रहण दिसण्याची वेळ मात्र सर्वत्र वेगळी आहे. सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी 12 तास आधी सुरू होतो. अशा स्थितीत 25 ऑक्टोबरला पहाटे 4.22 वाजल्यापासून सुतक कालावधी सुरू झाला. (Solar eclipse of October 25, 2022)

भारतात यंदाच्या वर्षातील दुसरं आणि  शेवटचं सूर्यग्रहण संध्याकाळी 4:22 पासून दिसेल आणि 5:42 पर्यंत दिसेल. काही वैज्ञानिक संस्थांच्या मते, मध्य प्रदेशात आंशिक सूर्यग्रहण दुपारी 4:26 वाजता होईल आणि सूर्यास्तानंतर समाप्त होईल. (surya grahan 2022)

सूर्यग्रहण पाहताना अशी घ्या काळजी
ग्रहण सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचे असेल तर काही खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नये. सूर्यग्रहण  थेट पाहिल्यास डोळ्यांना नुकसान होऊ शकते. 

सूर्यग्रहण पाहण्यासाठी अनेक लोक दुर्बिणी आणि सनग्लासेस वापरतात. पण त्यांचा वापरही करू नये असं मानलं जातं. ग्रहण पाहण्यासाठी विशेष सोलर फिल्टर असलेले चष्मेच वापरावेत. (surya grahan 2022 in india date and time)