Surya Gochar 2022: सूर्यदेव 9 दिवसानंतर करणार राशी बदल, 'या' तीन राशींच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणार

ज्योतिषशास्त्रात राशी बदलला खूप महत्त्व असते. चंद्र दर सव्वा दोन दिवसांनी राशी बदल करतो. तर सूर्य एका महिन्यानंतर राशी बदल करतो.

Updated: Jun 6, 2022, 02:01 PM IST
Surya Gochar 2022: सूर्यदेव 9 दिवसानंतर करणार राशी बदल, 'या' तीन राशींच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणार title=

मुंबई: ज्योतिषशास्त्रात राशी बदलला खूप महत्त्व असते. चंद्र दर सव्वा दोन दिवसांनी राशी बदल करतो. तर सूर्य एका महिन्यानंतर राशी बदल करतो. सूर्य या ग्रहाचा संबंध यश, आदर, पिता, गुरु, शासन प्रशासन, आरोग्य यांच्याशी आहे. त्यामुळे सूर्याचा राशी बदलाचा जीवनावर मोठा प्रभाव पडतो. सूर्यदेव 9 दिवसांनंतर म्हणजेच 15 जून रोजी मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याने बुधाच्या मिथुन राशीत प्रवेश करताच काही राशींसाठी हे संक्रमण शुभ, तर काही राशींसाठी हा बदल अशुभ ठरणार आहे. जाणून घेऊयात कोणत्या राशीला सूर्य ग्रह शुभ फळ देईल. 

सूर्य 'या' राशींचे भाग्य उजळवेल

वृषभ: सूर्य ग्रह वृषभ राशीच्या दुसऱ्या स्थानात प्रवेश करणार आहे. या स्थानाला ज्योतिषशास्त्रात धनस्थान म्हटलं जातं. त्यामुळे सूर्य भ्रमण वृषभ राशीच्या लोकांना खूप लाभ देईल. त्यांचे अडकलेले पैसे मिळतील. यामुळे आर्थिक स्थिती चांगली होईल. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या आर्थिक समस्या दूर होतील. नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते. नोकरीतील बदल तुमच्या प्रगतीची दारे उघडतील. व्यापाऱ्यांनाही फायदा होईल.

सिंह: सूर्याच्या राशी बदलामुळे सिंह राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल. उत्पन्नाचे नवीन मार्ग मिळतील. अचानक आर्थिक लाभ होईल. व्यावसायिकांचा नफा वाढेल. ज्यांना गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी ही वेळ चांगली आहे. या काळात नवीन करार होतील आणि भविष्याच्या दृष्टीकोनातून फायदेशीर ठरतील.

कन्या: सूर्यदेवाचा मिथुन राशीतील प्रवेश कन्या राशीच्या लोकांच्या शुभ ठरेल. या वेळी नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. पदोन्नती मिळण्याचीही दाट शक्यता आहे. तुमचे काम चांगले होईल, लोक तुमची प्रशंसा करतील. वरिष्ठ अधिकारी सहकार्य करतील. मान-सन्मान वाढेल.

(Disclaimer:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे. अधिक बातम्यांसाठी फॉलो करा 24 Tass.com )